धनश्री महिला दुग्ध उत्पादन संस्था साळशिंगी तर्फे फिटनेस क्लब ची स्थापना
जितेंद्र गायकवाड
बोदवड,दि.13,साळशीगी ता.बोदवड येथील धनश्री महिला दुग्ध उत्पादन संस्था यांनी साळशिंगी येथे छत्रपती संभाजी महाराज फिटनेस क्लब ची स्थापना केली. साळशिंगी गावांमध्ये संत उत्तमराव महाराज यांचे स्वप्न पूर्ण झाले जे स्वप्न त्यांनी पाहिले ते स्वप्न धनश्री उत्पादन संस्था यांनी पूर्ण केले ,या फिटनेस क्लब चे उद्घाटन संत जनाबाई महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. जे विद्यार्थी गरीब आहेत त्यांना फिटनेस क्लब ची अतिशय कमी दर आणि जे गरजवंत आहेत त्यांना दूध मिळेल असे संस्थेचे चेअरमन जितेंद्र चौधरी यांनी सांगितले. तसेच मुलींसाठी सुद्धा फिटनेस क्लब स्थापन करावे असे ठरविण्यात आले. कुमारी दिशा पाटील सुवर्णपदक विजेता यांच्या वडिलांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. शिवश्री संजीव सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल माहिती सांगितली.
सदर कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष शिवमती जनाबाई महाराज चेअरमेन शिवमती सरोज चौधरी, व्याख्याते विजय सोनवणे,शिवश्री विजय ठाकरे, पं.स.सभापती किशोर गायकवाड, जि.प.सदस्य रामदास पाटील, जितेंद्र चौधरी ,संजय पाटील, वसंतराव देशमुख, निवृत्ती ढोले,विनोद कालबैले, दीलीप महाजन, विजय चौधरी, सुनील चौधरी ,चंद्रशेखर चौधरी, सुभाष गोंड ,संजय भिल,शरद मोते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवश्री अतुल पाटील यांनी केले






