अमळनेर शहरातील शासकीय,निमशासकीय कार्यालयांमध्ये महिला शौचालयांची कमतरता
अनेक वेळा तक्रारी करूनही शासनाचे दुर्लक्ष
अमळनेर ची शोकांतिका अधिकारी,लोक प्रतिनिधी महिला असूनही वारंवार महिला शौचालयांची करावी लागते मागणी…
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर
अमळनेर पुरोगामी विचारांचे आणि महिला सबलीकरण बाबतीत आघाडीवर आहे हे येथील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांना पाहून लक्षात येते परन्तु हेच अमळनेर महिला स्वच्छता गृहांच्या बाबतीत उदासीन आहे.
येथील विविध शासकीय निमशासकीय कार्यालये शाळा, महाविद्यालये इ ठिकाणी महिलांसाठी शौचालये उपलब्ध नाहीत.एकीकडे स्वच्छ भारत मोहीम राबविण्यात येत आहे. आणि दुसरीकडे महिलांसाठी स्वच्छता गृहे उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती आहे.शहरातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये महिलांसाठी स्वच्छता गृह उपलब्ध नाहीत.
१) अमळनेर उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयात इतर ही अनेक विभाग कार्यरतआहेत.या परिसरात अनेक महिलांचे विविध कामांसाठी येणे जाणे सुरू असते .अनेक महिला ग्रामीण भागातून आणि दूरच्या परिसरातून येथे कामानिमित्त येत असतात.परंतु येथे महिला स्वच्छता गृह उपलब्ध नाही. एकच महिला स्वच्छता गृह असून ते कार्यालयीन महिलांकरिता आहे आणि त्याला कुलुप असते त्यामुळे सामान्य महिलांना नैसर्गिक विधी कुठे करावेत हा प्रश्न निर्माण होत आहे.
२) पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात देखील हीच परिस्थिती आहे. या परिसरात ही अनेक उप विभाग सुरू आहेत आणि अनेक महिला काम करत असून ग्रामीण भागातील महिलांचे बचत गट आणि इतर कामांसाठी सतत येणे जाणे सुरू असते .येथे एकच स्वच्छता गृह असून ते बंद असते.बचत गट विभागात एक स्वच्छता गृह आहे परंतु ते अत्यन्त घाण आहे.या संदर्भात महाराष्ट्र मराठी 7 ने नेहमीच पाठपुरावा केला आहे.पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गावोगाव स्वच्छता अभियान राबवित आहेत परंतु त्यांच्याच कार्यालयात महिलांसाठी स्वच्छता गृहाचा अभाव आहे म्हणजे च गाव चालले सुधारायला आणि स्वतः च्या …खाली अंधार आहे.
३) शहरातील अत्यन्त लांब असलेल्या अमळनेर पोलीस ठाण्यात देखील स्वच्छता गृहात स्वच्छतेचा अभाव आहे. येथील स्वच्छता गृहात अनेक केमिकल, रसायने पडलेली असतात. स्वच्छता नाही त्यामुळे महिलांना तेथे नैसर्गिक विधीला जाता येत नाही.
४) अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या स्वच्छता गृहांची अवस्था अत्यन्त वाईट आहे. साफ सफाई ची कमतरता असून गरीब आणि गरजू महिला रुग्णालयात उपचार घेत असतात त्यांना अस्वच्छ शौचलयांमुळे साथीचे आजार लागू शकतात कारण येथे अधिक तर बाळंतपण साठी गरजू महिला येत असतात.या संदर्भातील लेखी तक्रार निवेदन गट विकास अधिकारी यांना वेळोवेळी दिले आहे.
५) शहरात आणि तालुक्यातील अनेक शाळा, महाविद्यालये आहेत या शाळा महाविद्यालयांमधून अनेक ग्रामीण शहरी भागातील विद्यार्थिनी शिकत आहेत अनेक शाळांमध्ये स्वच्छता गृह उपलब्ध च नाही.
उदा झाडी येथील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा येथे 5 वी ते 9 वी च्या मुली शेतात नैसर्गिक विधी साठी जातात.याची भ्रमण ध्वनी वरून संबंधित अधिकारी यांना तक्रार करूनही त्यांनी कार्यवाही केली नाही.
अश्या परिस्थितीत एखाद्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाले तर कोण जबाबदार राहील याचे उत्तर ही प्रशासनाला द्यावे लागेल.
अनेक शाळा महाविद्यालयांचा स्वतः सर्वे केला असता अनेक ठिकाणी स्वच्छता गृह नसून जे आहेत ते मुलींच्या आरोग्यदृष्टीने हानिकारक आहेत कारण ते स्वच्छ नाहीत.सॅनिटरी नॅपकिन उपलब्धता आणि डिस्पोजल व्यवस्था उपलब्ध नाही.या संदर्भाच्या लेखी निवेदने गटशिक्षणाधिकारी यांना वेळोवेळी दिली आहेत.
६) संपुर्ण धुळे रोड वर एकही नगरपरिषदेचे महिला स्वच्छता गृह उपलब्ध नाही. बस आगारातील स्वच्छता गृह अत्यन्त घाण आहे.
७) शहरात मोठं मोठे महिलांसाठी साडी विक्रेते आणि महिला साठी च्या वस्तू विक्रते यांची तीन मजली दोन मजली दुकाने आहेत. ह्या दुकांनामध्ये महिला तासनतास खरेदी साठी जात असतात या सर्व दुकांनामध्ये महिला स्वच्छता गृह असणे आवश्यक आहे. नगरपरिषद अश्या दुकाने मॉल यांना noc ना हरकत प्रमाणपत्र कसे देते हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जर दुकांनामध्ये महिलांसाठी स्वच्छता गृह नसेल तर त्या दुकानाला बंद करण्याचे अधिकार आणि नियम नगरपरीषद अधिनियम मध्ये तरतूद आहे. परंतु सुस्त नगरपरिषद आणि अधिकारी, लोक प्रतिनिधी यामुळे महिलांच्या प्रश्नांवर कार्य केले जात नाही.या संदर्भात अमळनेर नागरपरिषदेला वेळोवेळी तक्रार आणि निवेदन दिले आहे.
वरील प्रकारे अनेक वेळा हा विषय विविध मार्गांनी मांडण्यात आला असूनही त्यावर उपाय योजना होत नाही. मागील आमसभेत ही हा विषय प्रा जयश्री साळुंके यांनी मांडला होता. परन्तु कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. लवकरात लवकर या संदर्भात कार्य सुरू करावे अशी मागणी केली जात आहे.






