Pune

दुबई साखर परिषद 2020 चे ती दिमाखदार उद्घाटन

दुबई साखर परिषद 2020 चे ती दिमाखदार उद्घाटन

मा.हर्षवर्धनजी पाटील साहेब व कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांची भारतातून प्रमुख उपस्थितीती

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे-अत्यंत यशस्वी 4 वर्षानंतर, दुबई साखर परिषद 2020चा शुभारंभ रविवार 9 फेब्रुवारी 2020 रोजी इंटरकॉन्टिनेंटल दुबई फेस्टिव्हल सिटी येथे संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री मा.हर्षवर्धनजी पाटील साहेब व ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या (इस्मा) व इंडियन सुगर एक्झिम कॉर्पोरेशन लिमिटेड च्या डायरेक्टर कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थितीची लावली.

प्रसंगी भारतातील साखर उद्योगातील असलेले प्रमुख आव्हानांना बद्दल व त्यांच्या उपयोजना करिता कोण कोणते पाऊल उचलू शकतो, जागतिक पातळीवरील साखरेची मागणी व उपलब्धता, यासह साखर उद्योगांसमोरील समस्या, संधी व आव्हान , साखरेचे कमी- अधिक होणारे दर विपणन व शासकीय धोरण या विषयाची चर्चा करण्यात आली. साखर उद्योगाने आव्हानांना कसे सामोरे जावे आदी विषयांवर श्री.हर्षवर्धनजी पाटील साहेब व कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी प्रश्न उपस्थितीत करत मान्यवर तज्ञांशी चर्चा केली. उपस्थित साखर उद्योगातील तज्ञ मान्यवरांनी यासंदर्भात सकारात्मकता दाखवली.

दुबई साखर परिषद 2020 चे ती दिमाखदार उद्घाटन

या परिषदेचे आयोजन अल खलीज शुगरचे व्यवस्थापकीय संचालक व प्रधान भागीधारक जमाल अल घुराईर आणि एमेटर्राचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेकाॅब रॉबिन्स यांनी केले आहे.

साखर उद्योगातील सर्व प्रमुख मान्यवर व निर्यातदारांना एकत्र आणण्यासाठी या परिषदेचे आयोजन केले जाते. दुबई शुगर कॉन्फरन्स २०२० ने उपस्थितांना नवीन दृष्टीकोन, महत्त्वपूर्ण संधी आणि अमूल्य नेटवर्किंग व कनेक्शन प्रदान केले.

दुबई साखर परिषद 2020 चे ती दिमाखदार उद्घाटन

साखर बाजार आव्हानात्मक राहील, परंतु पुनर्प्राप्तीची मार्ग दर्शविल्यामुळे उद्योगासंदर्भातील मुद्द्यांबाबत स्पष्टता आणण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे.यामुळेच जगातील प्रमुख साखर उत्पादक, शुद्धीकरण करणारे, आयातदार, व्यापारी, औद्योगिक वापरकर्ते, वित्तीय संस्था, विश्लेषक, शिपिंग कंपन्या आणि सेवा पुरवठा करणारे एकत्र येऊन भविष्यातील कृती करण्यासाठी एकत्र आले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button