अनंतशांती बहूऊद्देशीय सामाजीक संस्थेस राज्यस्तरीय जनसेवा पूरस्कार प्रधान
कोल्हापूरः आनिल पाटील
श्री प्रथमेश मंदिर ट्रस्ट कोल्हापूर यांचा अनंतशांती बहुऊद्देशिय सामाजिक सेवा संस्थेला जनसेवा राज्य स्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला . शाहू स्मारक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला . .संस्थेने आजप्रयंत खेडो पाडी दुर्गब डोंगराळ भागात 125 हुन आधिक आरोग्य तपासणी शिबीरे लावली आहेत. महिला प्रशिक्षित केंद्रा अंतर्गत 300 हुन अधिक महिला स्वावलंबी बनवल्या आहेत. पर्यावरण संगोपणावर आधारीत 50 हजार रोपट्यांचे मोफत वितरण व 3000रोपट्यांचे यशस्वी जतन केले आहे.
या बद्दल शासनाने छञपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार दिला आहे .व्यसन मुक्ती केंद्रा अंतर्गत 120 हुन अधिक नागरीक व्यसना पासुन मुक्त झाले आहेत. शिवाय या अंतर्गत 50हुन अधिक रुग्णांना मोफत घरपोच औषध पुरवठा केला जातो.बालकांचा विकास घडवुन आणण्यासाठी पंच्यात्तरहुन अधिक बाल संगोपण व्याख्यान व बालकांच्या विकासाला चालना मिळण्यासाठी विविध स्पर्धा व स्पर्धा परिक्षाचे आयोजन तसेच दुर्बल व वंचित घटकातील मुलांना शैक्षणिक संधी लाबण्यासाठी शैक्षणिक दुष्टिकोनातुन मुले दत्तक घेणे व जर वर्षी दोन हजार मुलांना मोफत शैक्षणिक साहित्याचा पुरवठा करण्यात येतो अशा अनेक सामाजिक कार्याबद्दल संस्थेला हा राज्यस्तरीय पुरस्कार 3फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10वाजता शाहु स्मारक भवन दसरा चौक येथे राजु लाटकर .महाराट्र देवस्थान समितीचे महेश जाधव. उद्योजक रावसाहेब वंदुरे. समुह तज्ञ डाॕ.उत्तम गवाणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .






