भारतीय कोळी सेना युवा तालुका अध्यक्षपदी जगदीश कोळी यांची निवड
सुरेश कोळी
बोदवड भारतीय कोळी सेना या संघटनेची बोदवड युवा तालुका अध्यक्षपदी मानमोडी चे उपसरपंच श्री जगदीश मुरलीधर कोळी यांची निवड करण्यात आली.

सदर नियुक्ती जिल्हा अध्यक्ष संजय जी तायडे यांच्या अधिकृत पत्रकाद्वारे करण्यात आली. जगदीश कोळी हे बऱ्याच दिवसापासून बऱ्याच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. ते आज रोजी आदर्श मानमोडी गावाचे उपसरपंच म्हणून कार्यरत आहे . युवा तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल जिल्हा अध्यक्ष संजयजी तायडे यांनी संघटनेचे ध्येय धोरण समजून सांगितले व त्यांना नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा दिला आदर्श मानमोडी येथे सरपंच व गावातील नागरिकांनी त्यांचा सत्कार केला बोदवड तालुक्यातील कोळी बांधवांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.






