नीरा नदीवरील बंधाऱ्याच्या कामाला गती तर शेतकरी राजाला झाला आनंद
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील नीरा नदीच्या महापुरामुळे वाहून गेलेल्या बंधाऱ्याचे काम चालू झाल्याने शेतकरीवर्ग आनंदात झालेला आहे नदीला आलेल्या पुरामुळे गेली अनेक दिवसापासून शेतीच्या पिकासाठी पाणी अडवता येत नसल्याने कष्टकरी शेतकरी नाराज होता पावसाळा लागण्याआधी बंधाऱ्याचे काम पूर्ण होऊन शेतीच्या पिकासाठी पाणी अडवता येईल असेही या परिसरातील शेतकरी वर्ग सांगत आहेत बंधाऱ्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे तसेच संगम नरसिंगपूर तांबवे टणु या परिसरातील शेतकरी बंधारा वाहून गेल्यापासून नाराज होते
नरसिंहपूर चे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामस्थ तंटामुक्ती अध्यक्ष गावचे पोलीस पाटील आजी-माजी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सर्व ग्रामस्थांनी बंधाऱ्याचे काम चालू झाल्यामुळे या परिसराला आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे






