भैरवनाथ डोंगर मॉर्निंग ग्रुप तर्फे शूर सरदार तानाजी मालुसरे यांना आगळीवेगळी आदरांजली
दिलीप वाघमारे
सिंह गडावर कल्याण दरवाजा मार्गे 321 फूट लांब भगवा शूर वीर तानाजी मालुसरे यांना भगवी सलामी देण्यात येणार छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातील महत्त्वपूर्ण गड असणाऱ्या किल्ले कोंढाण्याची सिंहगड लढाई करताना धारातीर्थ पडलेल्या शूर सरदार तानाजी मालुसरे यांना आगळीवेगळी आदरांजली वाहण्यासाठी लोणंद तालुका खंडाळा येथील श्री भैरवनाथ डोंगर मॉर्निंग ग्रुप च्या वतीने रविवार दिनांक 2 फेब्रुवारी सकाळी आठ वाजता कल्याण दरवाजाच्या बाजूने किल्ला सर करताना 321 फूट लांब चार फूट रुंद भगवी रॅली काढण्यात येणार आहे.
तरी पुणे जिल्हा व सातारा जिल्ह्यातील मावळ्यांनी या प्रवाहात सामील होण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शशिकांत जाधव पुढारी पत्रकार एव्हरेस्ट विर प्राजक्त परदेशी संदीप शेळके पाटील यांनी केले आहे.






