मूकनायक शताब्दी वर्षानिमित्त आज चांप्यात वंचिताचा मेळावा
अनिल पवार
डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांचा आवाज मांडण्यासाठी सुरू केलेल्या मूकनायक पाक्षिकाच्या शताब्दी वर्षानिमित्त चांपा येथे शुक्रवारी ता , ३१ वंचितांच्या मेळावा आयोजित करण्यात आला आहे .
कार्यक्रमाचे उदघाटक आमदार राजूभाऊ पारवे , तर अध्यक्ष सरपंच अतिश पवार असतील .प्रमुख अतिथि म्हणून उमरेडचे तहसिलदार प्रमोद कदम , नायब तहसिलदार योगेश शिंदे , कुही चे पोलिस निरीक्षक पंजाबराव परघणे , सहायक गटविकास अधिकारी , गटशिक्षणाधिकारी जयसिंग जाधव असतील .प्रमुख पाहुणे ‘ बानाई’ चे अध्यक्ष पी .एस .खोब्रागडे , कवी डॉ .मछिंद्र चोरमारे , महेंद्र गायकवाड असतील .
गट ग्रामपंचायत चांपा येथे” भटके विमुक्त -आदिवासी विकास संघ आणि प्रगतीशील पत्रकार संघ तथा समाज पत्रकार संघाच्या वतीने हे आयोजन केले आहे .पुढील वर्षभरात शंभर सामाजिक कार्यकर्त्यांना मूकनायक सन्मानाने गौरविण्यात येणार आहे .अशी माहिती निवड समितीच्या वतीने डॉ .वासुदेव डहाके , प्रा .मोहन चव्हाण , मिलिंद सोनूने , मुकुंद आडेवार यांनी दिली आहे .
कार्यक्रमात चांपा परिसरातील सर्व भटके विमुक्त आदिवासी वंचित समाजाचा मेळावा निमित्त जास्तीतजास्त संख्येत आपली उपस्थिती राहण्याचे आवाहन सरपंच अतिश पवार यांनी केले आहे .






