Amalner

अमळनेर गटविकास अधिकारी महिलांच्या लागतात नादी… मग मागतात माफी…हगणाऱ्यांचे डबे गोळा करता करता मुख्य कामांचा विसर व अक्षम्य चुका

अमळनेर गटविकास अधिकारी महिलांच्या लागतात नादी… मग मागतात माफी

हगणाऱ्यांचे डबे गोळा करता करता मुख्य कामांचा विसर व अक्षम्य चुका

प्रा जयश्री साळुंके

अमळनेर येथील गटविकास अधिकारी यांना अक्षम्य चुका करून माफी मागायची जणू सवय आहे. विशेषतः ह्या घटना महिलांच्या बाबतीत अधिक घडत आहेत असे निदर्शनास आले आहे. खुर्चीचा गर्व आणि अति आत्मविश्वास वाढला की डोकं काम करत नाही असे म्हणतात हे तंतोतंत प्रभारी गटविकास अधिकारी अमळनेर यांना लागू होत.
छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य ने माहिती अधिकारात माहिती मागवली होती .ह्या माहितीच्या अधिकाराची अपील साठी क पत्र व्यवहार करण्यात आला. मात्र फक्त सही राम असलेले गटविकास अधिकारी यांनी त्या अपिलीय पत्रावर तारीख आणि वेळ टाकलीच नव्हती हे न पाहताच सही करून अपिलीय महिला ऍड अलका मोरे पाटील यांना पत्र पाठवले यासंदर्भात छावा जनक्रांती संघटनेने अमळनेर गटविकास अधिकारी यांना निलंबित करा अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर राज्य माहिती आयोगाने तथा पंचायत समिती मुख्याधिकारी यांनी त्यांना धारेवर धरत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले होते.दि 28 जानेवारी 2020 ऍड अलका मोरे पाटील यांना समक्ष बोलावून अमळनेर गटविकास अधिकारी यांनी लेखी माफी मागितली खरी परंतु ती देखील अर्धवट आहे.

माफी पत्राच्या विषयात माफीचा कुठेही उल्लेख नाही तसेच फक्त दिनांक लिहिला गेला नाही एवढाच उल्लेख पत्रात केला आहे वेळ पण अपिलीय पत्रात दिलेली नव्हती हे गटविकास अधिकारी हगणाऱ्यांचे डब्बे गोळा करता करता विसरून गेले आहेत. त्यामुळे ही माफी कितपत योग्य आहे आणि स्वीकारणीय आहे का या बाबतीत एड अलका मोरे पाटील यांच्या शी प्रत्यक्ष बोलणे केले असता त्या म्हणाल्या की बरे झाले अजून एक चूक केली आहे पाहता येईल परत.तसेच गटविकास अधिकारी अत्यन्त उद्धट व मॅनर्स नसलेले आहेत असेही त्यांनी मत व्यक्त केले आहे.त्यामुळे तात्पुरता जरी हा विषय मिटलेला वाटत असला तरी पुढे पुन्हा ह्यावर प्रतिक्रिया उमटू शकतात अशी शक्यता आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button