Pune

♦”कायमचे शांत करू…” अशी थेट धमकी गांधींना गांधींच्या खुनाआधी अवघ्या ५२ दिवस आधी देणारा गोळवलकर तुमच्या RSS चा बाप आहे कि नाही ….❓

महात्मा गांधी स्मृती दिना निमित्त आदरांजली

♦”कायमचे शांत करू…” अशी थेट धमकी गांधींना गांधींच्या खुनाआधी अवघ्या ५२ दिवस आधी देणारा गोळवेलकर तुमच्या
RSS चा बाप आहे कि नाही ….मिस्टर मोदी उत्तर द्या …..

अतिथी संपादक डॉ संजय दाभाडे

?” मिस्टर मोदी ,
नेहरू मेमोरियल मधील खालील दस्तऐवज मागवून घ्या
आणि जनतेला उत्तर द्या , खुलासा करा ….तुम्ही संघ
स्वयंसेवक आहात नि चड्डी देखील घालता संघाची ,
तर एकदा ह्यावर खुलासा
कराच —-“?” आमच्या रस्त्यात जो कुणी व्यक्ती येईल त्याला आम्ही ताबडतोब शांत करू “…..संघचालक गोळवेलकरने असा इशारा ८ डिसेम्बर १९४७ रोजी दिला होता …त्यानंतर अवघ्या ५२ दिवसांनी गांधींना ‘ शांत ‘ करण्यात आले , कायमचेच …❗
ज्या पटेलांचा ‘ संघ स्वयंसेवक ‘ मोदींनी भव्य पुतळा उभारला त्याच पटेलांनी संघा वर बंदी आणली होती …..❗?दिल्लीतील प्रसिद्ध नेहरू मेमोरियल व म्युझियम मध्ये एक महत्वाचा दस्तऐवज उपलब्ध आहे….
८ डिसेंबर १९४७ रोजीच्या आरएसएस ( राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ) प्रमुख गोळवेलकर ह्यांच्या एका सभेचा वृत्तांत तत्कालीन इंटेलिजन्स ( गुप्तचर ) एजन्सीने दिला होता. तो रिपोर्टच नेहरू मेमोरियल मध्ये उपलब्ध आहे.♦"कायमचे शांत करू..." अशी थेट धमकी गांधींना गांधींच्या खुनाआधी अवघ्या ५२ दिवस आधी देणारा गोळवलकर तुमच्या RSS चा बाप आहे कि नाही ....❓त्या अहवालात म्हटलं आहे कि –एम.एस .गोळवलकरची सभा रोहतक रोड जवळील संघाच्या कॅम्पवर सुरु होती….संघाचे २५०० सदस्य उपस्थित होते.? गोळवेलकरने संघाच्या स्वयंसेवकांना पुढील बिकट परिस्थितीची कल्पना दिली. गोळवलकर म्हटले ,” संघाला कुणीच पराभूत करू शकत नाही. पृथ्वीवरील कोणतीही ताकद मुसलमानांना हिंदुस्तानात थांबवू शकत नाही.
मुसलमानांना भारत सोडावाच लागेल. मुसलमानांची मते काँग्रेसला मिळावीत म्हणून महात्मा गांधींना मुसलमानांना भारतात राहू द्यायचे आहे. पण तो पर्यंत एक सुद्धा मुसलमान भारतात राहणार नाही. जर त्यांना भारतात राहू देण्यात आले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारवर असेल , हिंदू त्यास जबाबदार नसतील. महात्मा गांधी फार काळ हिंदूंना फसवू शकणार नाही. आमच्याकडे असे मार्ग व उपाय आहेत कि आम्ही अश्या माणसांना ताबडतोब शांत करू शकतो , पण आमची परम्परा अशी आहे कि आम्ही हिंदूंना अपाय करत नाही. परंतु जर वेळ आलीच तर आम्ही तसे करण्यास मागे पुढे बघणार नाहीत …..”हे शब्द जसेच्या तसे ‘ इंटेलिजन्स एजन्सी ‘ च्या अहवालातील आहेत….? मिस्टर मोदी , सांगा हे कि गोळवलकर ज्या ‘ हिंदू ‘ बद्दल बोलत होते ते ‘ गांधी ‘ च होतेकि नव्हते ….❓
मिस्टर मोदी , सांगा हे कि गोळवलकर तुमचे , तुमच्या संघाचे आयडिऑलॉग व आदर्श आहेत कि नाही ….❓♦डॉ.संजय दाभाडे ,
[email protected]
पुणे ….♦संदर्भ – ” The Majoritarian State ,How Hindu Nationalism Is Changing India ” , Edited by
Angana Chatterji , Thomas Blom Hansen and Christophe Jaffrelot , Page Number 55 -56 , Published by Harper Collins ….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button