सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना या हंगामाचे २९००/- रुपये प्रतिटन दर देणार….
५ लाख १ साखर पोत्याचे पूजनाच्या वेळी घोषणा….चेअरमन नविद मुश्रीफ
तुकाराम पाटील
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची गेली पाच हंगामामध्ये प्रत्येक वर्षी ऊसदराच्या एफ.आर.पी. पेक्षा १००/- रुपये पासून २००/- रुपये पर्यंत प्रतिटन ज्यादा दर दिला आहे. याहीवर्षी म्हणजेच २०१९-२०२० या हंगामामध्ये आलेल्या ऊसासाठी २८००/- रुपये प्रतिटन दर दिला आहे. तो २९००/- रुपये प्रतिटन दर देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केली. हा ऊस दर यावर्षीच्या एफआरपीपेक्षा 232 रुपयांनी ज्यादा आहे.
बेलेवाडी काळम्मा – धामण ता कागल येथे कारखाना कार्यस्थळावर आयोजित या हंगामामध्ये उत्पादित झालेल्या ५ लाख १ साखर पोत्याचे पूजन केल्यानंतर उपस्थित ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांसमोर बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने मागील हंगामामध्ये सुद्धा २९००/- रुपये प्रतिटन पर्यंत दर दिला आहे.
कारखान्याने या हंगामामध्ये ता. 25 जानेवारी 2020 पर्यंत चार लाख, 20 हजार मे. टन ऊसाचे गळीत केले असून पाच लाख क्विंटल साखर पोती उत्पादन केली आहे. आजची गाळप 6220 मेट्रिक टन असून 9300 साखर होती उत्पादित झाली आहेत .आजचा साखर उतारा 13.40 % इतका असून सरासरी साखर उतारा 12.25% इतका आहे.
या हंगामामध्ये व्यवस्थापनाने ७ लाख मे.टन गाळप करून ९ लाख क्विंटल साखर पोती, सव्वा कोटी लिटर इथेनॉल व कोजन प्रकल्पामधून 7 कोटी युनिट विज निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे, ते पूर्ण करण्यासाठी सभासद, ऊस उत्पादक, शेतकरी, अधिकारी व कामगार, तोडणी-वाहतूकदार हे सर्व घटक जिवाचे रान करत आहे, त्यांच्या सर्वांच्या सहाय्याने आम्ही संस्थापक नामदार मुश्रीफ साहेबांचे स्वप्न पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तरी कृपया ऊस उत्पादक, शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, अशी विनंती ही त्यांनी केली.
31डिसेंबर 2019 पर्यंतची ऊस बिले प्रति टन 2800 रुपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली आहेत. 1 जानेवारी ते 15 जानेवारी2020 पर्यंतची ऊस बिले बँकेकडून तपासून घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
यावेळी जनरल मॅनेजर महेश जोशी, मुख्य शेती अधिकारी प्रताप मोरबाळे, चीफ केमिस्ट मिलिंद चव्हाण, चीफ इंजिनियर हुसेन नदाफ, डिस्टलरी मॅनेजर संतोष मोरबाळे, मॅनेजर मिलिंद पंडे, ऊस विकास अधिकारी उत्तम परीट, बी. ए. पाटील, एम. एस. इनामदार बापूगोंडा पाटील, भूषण हिरेमठ उपस्थित होते. आभार कामगार कल्याण अधिकारी संतोष मस्ती यांनी मानले.






