Lonand

दीड कोटीच्या विमासाठी स्वतःच्या खून भासवून केला मित्राचा खून

दीड कोटीच्या विमासाठी स्वतःच्या खून भासवून केला मित्राचा खून

दिलीप वाघमारे

बोधेवाडी तालुका कोरेगाव येथील खुनाचे गूढ उकलले वाठार पोलिसांना अखेर यश संपादन मृत्यूनंतर मिळणारी विम्याचे पैसे मिळवण्यासाठी दुसऱ्या मित्राचा खून करून आपलाच खून झाल्याचा बनाव करणाऱ्या संशयित सुमित सुरेश मोरे राहणार महिमानगड तालुका मान या तरुणाला पोलिसांनी अटक केली.

खुनाचे सत्य समोर आल्यानंतर भयानक गौड बंगाल समोर आल्याने पोलिस चक्रावले आहेत.वाठार स्टेशन रस्त्यावरील पिराचा घाट शेजारी 21 जानेवारी रोजी अर्धवट जळालेला मृतदेह मिळून आला त्यानंतर अज्ञात व्यक्ती वर गुन्हा दाखल झाल्यानंतर वाठार स्टेशन पुसेगाव पोलीस स्टेशन लोणंद पोलीस स्टेशनचे ऑफिसर पोलिसांनी संयुक्तपणे तपास करून खुनाचे गुढ उकलले. आता सुनील बाबा वय वर्ष 31 राहणार उकिरडे तालुका मान जिल्हा सातारा या तरुणाचा खून करून मृतदेह आला स्वतःची कपडे घालून कुणी ओळखू नये म्हणून चेहऱ्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा अर्धवट प्रयत्न केला.

तपासा नंतर आरोपीस जेजुरीला पकडण्यात आले.त्यानंतर त्यास या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील डीवायएसपी सुहास गरुड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक स्वप्निल धोंगडे लोणंद पोलीस स्टेशनचे संतोष चौधरी आदी प्रयत्न केले याबद्दल सातारा जिल्हा पोलिसांचे अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button