प्रा. डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी यांना राज्यस्तरीय श्रमशक्ती “समाजभूषण” पुरस्कार प्रदान
कोल्हापूर ःआनिल पाटील
गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजच्या रसायनशास्त्र शाखेच्या असिस्टंट प्रोफेसर व ईगल फाउंडेशनच्या महिला जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी या राज्यस्तरीय श्रमशक्ती “समाजभूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांनी केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक, पूर मदत,निसर्ग संवर्धन व सामाजिक कार्याबद्दल श्रमशक्ती प्रतिष्ठानचा २०२० चा राज्यस्तरीय श्रमशक्ती ” समाजभूषण” पुरस्कार संस्थापक अमित काकडे यांनी जाहीर केला होता, तो टी वि स्टार जिजी यांच्याहस्ते नूकताच प्रधान करण्यात आला .
पुरस्कार वितरणाचा हा कार्यक्रम श्रीमंत नारायण घोरपडे नाटयगृह येथे खासदार मा.धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, नगराध्यक्षा सौ अलका स्वामी तसेच मराठी सृष्टीतील दिग्गज कलाकार आनंद काळे, कमल ठोके, मिलिंद अष्टेकर, अवधुत जोशी, सुरभी मसनाळे, मंजुषा खेत्री, जयप्नकाश परूळेकर, जुगलकिशोर ओझा, राहुल राजशेखर उद्योजिका सौ. स्मिता लंगडे, सौ मनीषा फराकटे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
त्यांना त्यांच्या आईसाहेब लता गोसावी, बंधू प्रा. शशिकांत गोसावी, पती श्री सुरेश गिरी मुलगा सुहर्ष,सून देविका, नातू देवर्षं व शिक्षण प्रसारक मडंळ कोल्हापूरचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष माजी प्राचार्य शिवाजीराव सावंत, पेट्रन सदस्य युवानेते दौलतराव देसाई, प्रशासनाधिकारी प्रा. डॉ.मंजिरीताई देसाई यांचे प्रोत्साहन लाभले व प्राचार्य डॉ. पी के पाटील, उपप्राचार्य पिसाळसर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व आजी -माजी विदयार्थी , पालक , शिक्षक बंधूभगिनी, ईगल फौंडेशन, न्यु पेपर गंगाधर श्रमशक्ती प्रतिष्ठान मित्रपरिवार ,नातेवाईक यांचेकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.






