वरूड जहागीर येथील संत सेवालाल नगरीच्या तरूणानी गाव ते तांडा साफ सफाईचा घेतला वसा.
विशाल मासुरकर
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वरूड जहागीर येथील संत सेवालाल नगरीमध्ये 15/2/2020 रोजी संत सेवालाल महाराज जयंती साजरी होणार असल्याने संत सेवालाल महाराज जयंतीच्या अगोदर आपलं गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून पहाटे उठून अनेक तरुण रस्ताच्या कडेला वाढलेली झाडे झुडपे तोडून स्वच्छ करत असून गावातील लोकांना शौचालय वापर करण्यासाठी विनंती करत असून हा उपक्रम यशस्वी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा संकल्प केला आहे.







