पोलीस कॉन्स्टेबल अमोल अडसूळ यांनी कोर्टामध्ये आग लागलेली विजवणे साठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल खंडाळा न्यायदंडाधिकारी यांच्या वतीने विशेष कौतुक
दिलीप वाघमारे
लोणंद पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल आडसूळ बक्कल नंबर 2269 यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी पुढाकार घेऊन न्यायालयीन मालमत्ता व जीवित हानी होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल खंडाळा फौजदारी न्यायालय दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चव्हाण साहेब यांनी पोलिस अधीक्षक सातारा यांना पत्राद्वारे कळवले आहे खंडाळा कोर्टामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर लगेच जनरेटर सुरू केला व अचानक स्फोट झाला व जनरलने पेट घेतला त्यावेळीअडसूळ जवळ होते त्यांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ आग विझवण्यासाठी धावून गेले काही क्षणांमध्ये आग विझवली अडसूळ यांच्या कामगिरीबद्दल लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या यांच्यासह सर्व सहकारी यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.






