Amalner

धनदाई महाविद्यालयात गुणवत्ता विकास कार्यशाळा संपन्न.

धनदाई महाविद्यालयात गुणवत्ता विकास कार्यशाळा संपन्न.अमळनेर : येथील धनदाईमाता कला व विज्ञान महाविद्यालयात आई क्यू ए सी विभागामार्फत “गुणवत्ता सुधार व नैक मूल्यांकन प्रक्रियेतील नवीन बदल” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व नैक समिती सदस्य डॉ एन. एस. धर्माधिकारी हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मानव्यविद्या विभागाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ प्रमोद पवार हे होते.धनदाई महाविद्यालयात गुणवत्ता विकास कार्यशाळा संपन्न.नैक मूल्यांकन प्रक्रियेत 2020 सालापासून अमुलाग्र बदल होणार असून ही प्रक्रिया महाविद्यालयाच्या गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे व ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे आई क्यू ए सी विभाग प्रमुख प्रा लिलाधर पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले. डॉ धर्माधिकारी यांनी या दशकात उच्च शिक्षण क्षेत्रात येऊ घातलेल्या नवीन बदलांचा आढावा घेतला नैक मूल्यांकन प्रक्रिया प्रक्रिया जटिल आहे असे समजून घाबरून जाण्याची गरज नाही असे स्पष्ट करून बदलत्या काळाबरोबर महाविद्यालयातील शिक्षकांनी अपडेट होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. अध्ययन-अध्यापन कार्यात आई. सी. टी .टूल्सचा प्रभावी वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विविध उपक्रम राबविण्याचा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ प्रमोद पवार यांनी येऊ घातलेल्या बदलांपासून पळ काढता त्यांना सामोरे जाण्याचे आव्हान केले.
अशा प्रकारच्या कार्यशाळा नवीन बदल समजवून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे मनोगत उपस्थित प्राध्यापकांनी व्यक्त केले. या प्रसंगी डॉ भगवान भालेराव, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. रमेश पावरा, डॉ. राहुल इंगळे, प्रा. महादेव तोंडे, डॉ. संगीता चंद्राकर, प्रा. मीनाक्षी इंगोले, डॉ. शुभांगी चव्हाण ,प्रा. श्रीचंद चव्हाण प्रा. दिनेश पटलेआदी उपस्थित होते.कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कैलास आहिरे, एस.बी गिरासे, किशोर पाटील, विष्णू शेट्ये, राजेंद्र पाटील, नारायण पाटील , दगडू पाटील आदींनी प्रयत्न केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. लिलाधर पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. किशोर पाटील यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button