Amalner

काय आहे गट नं 1313 ची गोलमाल…नगरपरिषद मुख्याधिकारी,प्रांताधिकारी यांच्या आशीर्वादाने सुरू आहे बेकायदेशीर बांधकाम….

काय आहे गट नं 1313 ची गोलमाल…नगरपरिषद मुख्याधिकारी,प्रांताधिकारी यांच्या आशीर्वादाने सुरू आहे बेकायदेशीर बांधकाम….

जयश्री साळुंके

गट नं 1313 येथे रवीनगर मागील बाजूस, लेआऊट परवानगी, बांधकाम परवानगी नसताना बांधकाम सुरुआहे.हे बांधकाम कोणाच्या आशीर्वादाने होत आहे.अमळनेर मुख्याधिकारी यांनी या अवैध बांधकामाकडे का दुर्लक्ष केले?

तसेच शहरात गौणखनिज वाहतूक बंद असताना सुमारे 100 ब्रासच्या वरती मुरूम, डबर, दगड वापरण्यात आलेला दिसत आहे. त्याच बरोबर नगरपरिषद बांधकाम विभागाने बांधकाम परवानगी दिली आहे का? हे हि पाहणे आवश्यक आहे तसेच विश्वसनीय सुत्रां कडून कळले आहे कि कुठलिही परवानगी नसताना शासनाच्या नियमांना धतुरा दाखवण्याचे काम लेआऊट धारकाकडून करण्यात आला आहे..

काय आहे गट नं 1313 ची गोलमाल...नगरपरिषद मुख्याधिकारी,प्रांताधिकारी यांच्या आशीर्वादाने सुरू आहे बेकायदेशीर बांधकाम....

शासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनी यावर कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे..
केंद्राच्या म्हाडा स्कीम मधून लेआऊट मंजुरी आहे.. त्यासंबंधी कोणतीही जाहिरात निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नाही.

काय आहे गट नं 1313 ची गोलमाल...नगरपरिषद मुख्याधिकारी,प्रांताधिकारी यांच्या आशीर्वादाने सुरू आहे बेकायदेशीर बांधकाम....

पण नगरपरिषद परवानग्या नाहीत तरीही राजरोसपणे बांधकाम सुरू आहे. शासन मूग गिळून गप्प का बसले आहे. कोणत्या दबावाखाली अधिकारी आहेत?जोर महालक्ष्मी चा आहे गुंडगिरी चा ?

सामान्य लोकांच्या लहान लहान वाळूच्या गाड्या पकडून चमकोगिरी करणारे अधिकारी ह्या मोठ्या धेंडा ना का हात लावत नाहीत? गौणखनिज कायदयाची पायमल्ली केली गेली आहे..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button