Amalner

अमळनेर गटविकास अधिकारी फ्रस्ट्रेशन मध्ये… हागणदारी मुक्त योजना अयशस्वी… गरीब जनतेवर होत आहे अन्याय…

अमळनेर गटविकास अधिकारी फ्रस्ट्रेशन मध्ये…
हागणदारी मुक्त योजना अयशस्वी…
गरीब जनतेवर होत आहे अन्याय…

जयश्री साळुंके

अमळनेर चे गटविकास अधिकारी मानसिक कार्य पूर्ण करू न फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन गरीब जनतेवर गुन्हे दाखल करत आहेत.सामान्य गरीब जनतेवर गुन्हे दाखल करून गटविकास अधिकारी स्वतः चे अपयश लपवित आहेत आणि स्वतःची प्रसिद्धी करून घेत आहेत. परंतु खऱ्या अर्थाने ते ग्रामीण भागात हागणदारी मुक्त गाव ही योजना
पोहचविण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांना फ्रस्ट्रेशन आले असून त्या अवस्थेत ते रात्री बे रात्री सामान्य लोकांना टॉर्चर करत आहेत.

या संदर्भात सामान्य लोकांनी एकत्रित येण्याची गरज असून गटविकास अधिकारी यांच्या विरुद्ध तक्रार करणे आवश्यक आहे. तसे ग्रामीण जनतेने मत मांडले आहे. ज्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यांनी गटविकास अधिकारी यांना शौचालय आणि जनजागृती ,ग्रामसेवक सरपंच यांच्या कार्याची माहिती घेणे आवश्यक आहे असे सामान्य जनता म्हणत आहे.

ज्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत त्याच प्रमाणे नैसर्गिक विधी देखील मूलभूत गरज आहे मानव अधिकार आयोगा मार्फत सामान्य लोकांना त्यांच्या मूलभूत गोष्टी पासून दूर ठेवणे गुन्हा आहे आणि गटविकास अधिकारी यांच्या वर तो गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये असा प्रश्न सामान्य लोकांना पडला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button