डोंगरखर्डा येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला नाम फाऊंडेशन कडून आर्थिक मदत
रुस्तम शेख प्रतिनिधी यवतमाळ
:- सिने अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपूरे यांच्या प्रेरणेतून नाम फाऊंडेशन स्थापन करण्यात आले तरी नाम मागील ०५ वर्षापासून शेतकरी व शेतकरी कुटुंबाकरीता कार्य करीत आहे. यवतमाळ जिल्हयात कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा गावातील वाल्मीक धरणे यांनी दिनांक ०१.०७.२०१९ ला आत्महत्या केली असून त्याच्या पत्नी मिना धरणे हिला नाम कडून १५०००/- रुपये सानुग्रह राशी देण्यात आली. या सानुग्रह राशी मधून किमान रोजगार निर्मिती करून तिला कुटुंबाचा गाडा चालविता यावा या करिता ही मदत विदर्भ व खानदेश समन्वयक श्री हरीष इथापे यांच्या माध्यमातून व नितिन पवार रसिकाश्रय संस्था घाटंजी यांच्या सहकार्याने ही आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला तरी यावेळी स्वामिनीच्या मनीषा काटे,सुधाकर निखाडे, सुधाकर पवार, प्रशांत भोयर, धिरज भोयर, कुणाल पंचबुद्धे, नितीन शेळके, तेजस पंचबुद्धे, सागर चौदरी, विश्वजित दहाणे, अविनाश इंगळे, गणेश वाघमारे, अफियान खान उपस्थिती होती..






