राजू शेट्टींची ‘स्वाभिमानी’ उतरणार रस्त्यावर, बुधवारी भारत बंदची हाक
पुणे प्रतिनिधी दत्ता पारेकर
: आरसीईएफ अर्थात प्रादेशिक व्यापार आर्थिक भागीदारी कराराला संपूर्ण देशातील 265 शेतकरी संघटनांचा विरोध आहे. स्वतः राजू शेट्टी या संघटनांना सोबत घेऊन पुढाकार घेत आहेत. यासाठी 8 जानेवारीला संपूर्ण ग्रामीण भारत बंद स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारला असल्याचे स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी सांगितले.
ते म्हणाले, केंद्र सरकार आरसीईएफ करारानुसार चीन, ऑस्ट्रेलीया, मलेशिया सारख्या देशातून पामतेल, दूध, केळी, तांदूळ अशी आयात करणार आहे. यामुळे भारतासह महाराष्ट्रातील शेतकरी संकटात येणार असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा या कायद्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना विरोध करीत आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने या बंदचे आयोजन करण्यात आले असून राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण ताकदीने या बंदमध्ये उतरणार आहे.






