Bhusawal

खासदार उन्मेश दादा पाटील यांची भुसावळ डी आर एम कार्यालयात मॅरेथॉन बैठक

खासदार उन्मेश दादा पाटील यांची भुसावळ डी आर एम कार्यालयात मॅरेथॉन बैठक

पाच तास चालली बैठक : पॉवर प्रेझेंटेशन द्वारे घेतला समस्यांचा आढावा

जळगाव शहरातील उड्डाणपूलाची समस्या सोडविण्यासाठी रेलवे प्रशासनाला पाहणीचे करण्याचे खासदारांचे आदेश

भुसावळ — औरंगाबाद पहूर रेल्वे मार्गाचे प्रस्तावित काम, भुसावळ ते मनमाड तिहेरी मार्गाच्या अधिग्रहणातील शेतकऱ्यांच्या अडचणी, पाचोरा जामनेर मार्ग पुढे बोदवड पर्यंत कामाची सद्यस्थिती, वेल्डिंग बट फ्लॅश कारखाना जामदा येथे स्थलांतर करणे, शिवाजी नगर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे नागरिकांची होणारी प्रचंड गैरसोय थांबविण्यासाठी त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून तहसील कार्यालयाजवळ स्काय वॉक तयार करणे तसेच भोईटे नगर उड्डाणपुलावरून पिंप्राळा कडे जाण्यासाठी उड्डाणपुलाची उभारणी, ब्राह्मण सभेचे जवळ अंडरपास करण्याचा प्रस्ताव या सारख्या अडचणी दूर करण्यासाठी रेल्वे मनपा अधिकारी, पदाधिकारी, आणि लोकप्रतिनिधी नागरिक यांच्या उपस्थितीत शनिवारी पाहणी करण्याचे आदेश खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज भुसावळ मंडल रेल प्रबंधक बैठकीत दिले आहेत. रेल्वे संदर्भातील सोयीसुविधा समस्या व प्रलंबित व प्रस्तावित कामांची माहिती घेण्यासाठी बैठक बोलावली होती. खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस भुसावळ मंडल रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांच्या सह अधिकारी उपस्थितीत होते. बैठकीला रेल्वे विभागाचे सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच जळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती एड. सुचिता हाडा, नगरसेवक नवनाथ दारकुंडे ,नगरसेवक मयुर कापसे, एड. दिलीप पोकळे नगरसेविका सविता नेरकर,प्रतिभा देशमुख, एड. राजेन्द्र सोनवणे, प्रशांत वाघ ,पालिकेचे शहर अभियंता सुनील भोळे, प्रकल्प अभियंता इस्माईल शेख,अभियंता योगेश बोरोले, सहाय्यक मंडल रेल प्रबंधक मनोज सिंन्हा, आर के शर्मा, डॉ. स्वप्नील नीला, राजेश चिखले, तरुण दंडोतीया ,पोलीस कमांडंट ऑफिसर ए के दुबे,निशान त्रिवेदी उपस्थित होते,

स्कायवॉक साठी रेल्वे सकारात्मक

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने दूध फेडरेशन, ममुराबाद पूल हे पर्यायी रस्ते लांब आहेत.दोन्ही रेल्वेमार्गावरून ठिकाणी स्कायवॉक तयार करावा अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली. या पर्यायाला रेल्वे विभागाने सकारात्मकता दर्शविली आहे. प्रत्यक्ष पाहणी नंतर अहवाल सादर करावा. त्यावर रेल्वेच्या जनरल मॅनेजर व दिल्लीत रेल्वे प्रशासनाकडून प्रस्तावास मंजुरी देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे सांगितले.पाचोरा जळगाव दरम्यान रेल्वेच्या तिसऱ्या जमीन अधिग्रहणाच्या बाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत असून त्याबाबत बैठकीचे आयोजन करावे असे आदेश दिले. रेल्वेच्या प्रस्तावित आणि प्रलंबित कामांबाबत कार्यालयाने वेळीच पावले उचलावी अशी त्यांनी सांगितले.डी.आर.एम. विवेककुमार गुप्ता यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांचे झाडाचे रोप देऊन स्वागत केले. कर्मचारी व त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची ओळख करून दिली. रेल्वे सहाय्यक व्यवस्थापक आर के शर्मा यांनी दोन तास पावर प्रेसेंटेशन द्वारा रेल्वे विभागातील सर्व रेल्वे स्टेशन विभाग भुसावळ अंतर्गत येणाऱ्या कामकाजाची माहिती करून दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button