? Big Breaking….
हागणदारीमुक्त आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अमळनेर गटविकास अधिकारी यांनी जाहीर केलेले अस्वच्छ हेडावे...
अमळनेर
हेडावे गावात गटारी तुंबल्या आहेत.. गावात डासांची संख्या जास्त भरपूर आहे… साथीचे रोग मलेरिया, डेंग्यू इ कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर जोरात आक्रमण करत आहेत…
गावात काही आजारी रुग्ण सुद्धा आहेत…
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अस घडू शकत नाही कारण आरोग्य प्रशासन आणि प्रशासन तुमची काळजी घेतंय… मान्य आहे पण जेव्हा ठोस प्रहार आणि बोलो अमळनेरची टीम जेव्हा ह्या हेडावे गावात पोहचली आणि पाहिलं तर हे सगळे प्रकार समोर आले तुम्हीच बघा..
महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या संदर्भात वेगवेगळ्या खबरदार्या घेतल्या जातायेत वेगवेगळ्या संस्था सरकारी कर्मचारी रात्रंदिवस यासंदर्भात लढा देत आहे असं होत असताना अमळनेर तालुक्यातील हेडावे या गावात या आजाराचं गांभीर्य नागरिकांना तर आहेत परंतु अशा परिस्थितीत या हेडावे गावात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुठल्याही प्रकारची खबरदारी आता पर्यंत घेतली गेलेली नाही आहे.
गावात अस्वच्छता पाहता तुम्हाला ही कदाचित वाटेल की या गावाला कुठलं गाव घोषित करावं ?
गाव तर आधीच स्वतःला अतिशय हुशार आणि कार्य तत्पर म्हणून समजणाऱ्या तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदारी मुक्त आणि स्वच्छ गाव म्हणून घोषित करून टाकले आहे..त्यांनी कोणते निकष लावले आहेत हे काही समजायला मार्ग नाही…
अनेक दिवसापासून ग्रामपंचायतीत सरपंच देखील हजर नाहीयेत ना त्यांच्या मार्फत निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्यात आली तीदेखील नावापुरतीच, गटारी तर अक्षरश: अळ्यानी तुंबून वाहत आहेत यामुळे घाणीचं साम्राज्य आणि मच्छर डासांचा सुळसुळाट प्रचंड प्रमाणात निर्माण झालाय अशी माहिती गावातील काही नागरिकांनी आम्हाला पत्राद्वारे सुद्धा दिलीय
तर गावातील नागरिक बागूल यांनी डेप्युटी कलेक्टर यांच्याकडे कारवाईचा अर्ज तर दिलाच मात्र गावाच्या मेडिकल ऑफिसर ने सुद्धा आपला रिपोर्ट देत हे सिद्ध केलय की येथील अश्या कचरा आणि तुडुंब गटाऱ्यांमुळे रोगराई नक्की पसरेल याबाबत प्रशासनाला त्यांनी सूचना देखील केल्या परन्तु परिणाम शून्य आहे.लवकरात लवकर गावाला मदत आणि ग्राम पंचायत ने कामे करावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.






