Chimur

शेकडो लाभार्थी पंतप्रधान आवास योजने पासुन वंचित

शेकडो लाभार्थी पंतप्रधान आवास योजने पासुन वंचित
८६० अर्जा पैकी फक्त ११४ लाभार्थ्यांची निवड
योग्य छानणी करा अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

चिमूर बातमीदार ज्ञानेश्वर जुमनाके

.. चिमूर नगर परिषद क्षेत्रात पंतप्रधान आवास योजना लागु करण्यात आली .योजनेचे प्राथमीक काम करण्या करीता एका एजन्सीची निवड करण्यात आली.एजन्सीने त्यांना प्राप्त ८६०अर्ज छानणी करीता नगर परीषद प्रशासणा कडे सोपविले . तब्बल दोन महिन्याने ११४ अर्ज योग्य असल्याचे घाईने प्रस्ताव तयार करण्यात आले .त्यामुळे उर्वरीत शेकडो लाभार्थी पंतप्रधान आवास योजने पासुन वंचित राहण्याची भिती व्यक्त केल्या जात आहे .

चिमूर नगरपरीषद निर्मीती नंतर रमाबाई आवास योजना राबविण्यात आली .इतर प्रवर्गातिल गरजु नागरीकां करीता उशीराने पंतप्रधान आवास योजना लागु करण्यात आली. त्यामूळे हजारो नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या .योजना कार्यान्वयना करीता नेमलेल्या एजन्सीने सर्वेक्षण व इतर प्राथमिक काम करून एकुण प्राप्त ८६० अर्ज अंतिम छाननी करीता नगर परीषद प्रशासणा कडे सादर केलीत.संबधित प्रस्ताव तब्बल दोन महिने लालफित शाहीत अडकुन पडले .त्यांनतर घाई गडबळीने प्राप्त अर्जा पैकी फक्त ११४ अर्ज योग्य ठरवुन त्यांचे प्रस्ताव २५ फरवरीला तयार करण्यात आले .

योग्य प्रकारे छाननी न करता प्रस्ताव तयार करण्यात आल्याने इतर शेकडो नागरीक पंतप्रधान योजने पासुन वंचित राहण्याची भिती नागरीक तसेच नगरसेवक व्यक्त करीत आहेत .या योजनेचा प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा या करीता मुख्याधिकारी यांना नगरसेवक अॅड .अरूण दुधनकर यांनी पत्रा द्वारे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्राप्त अर्जाची योग्य प्रकारे छाननी करून प्रस्ताव सादर करण्याची मागणी केली आहे .तसेच हेच पत्र पालकमंत्री विजय वडेट्टीवार,विभागीय आयुक्त तथा नगर प्रशासण विभाग ,जिल्हाधिकारी , माजी आमदार अविनाश वारजुरकर, विधानसभा कॉंग्रेस नेते तथा जिल्हा परीषद सदस्य सतिश वारजुरकर यांनाही दिले .

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत नगर प्रशासणाच्या दिरंगाईने शेकडो लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे . त्याकरीता योग्य प्रकारे अर्जाची छाननी करून प्राप्त लाभार्थ्याना लाभ द्यावा अन्यथा नगर परिषद पुढे आमरण उपोषण करेन
अॅड . अरूण दुधनकर
नगरसेवक चिमूर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button