Amalner

? हेडावे येथील ग्रामसेविकेचे उद्धट उत्तर..अधिकाराची गुर्मी की पैश्यांची?की वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरद हस्त

? हेडावे येथील ग्रामसेविकेचे उद्धट उत्तर..अधिकाराची गुर्मी की पैश्यांची?की वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरद हस्त?

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर

अमळनेर येथून चार कि मी अंतरावर असलेल्या हेडावे ह्या गावातील अनेक समस्यांसंदर्भात अनेक वेळा तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्यामुळे आज ग्रामस्थांनी ठोस प्रहार च्या संपादिका आणि बोलो अमळनेर चे प्रतिनिधी यांना गावात येऊन आमची मागणी शासनापर्यंत पोहचवा असे लेखी पत्र पाठवले. त्यामुळे ठोस प्रहार आणि बोलो अमळनेर चे प्रतिनिधींनी या गावाला भेट दिली.

?️ भेटी दरम्यान अनेक गोष्टी उघडकीस आल्या..त्यात प्रामुख्याने..

  • ग्रामपंचायत ला कुलूप आढळून आले…
  • सरपंच,ग्रामसेविका गैरहजर असल्याचे दिसून आले..
  • ग्रामसेविका यांना भ्रमणध्वनी वरून विचारले असता त्यांनी तुम्हाला काय करायचे ते करा असे उद्धट उत्तर दिले..
  • आशा वर्कर गायब होत्या..
  • पोलीस पाटील स्वतः कोरेन्टाईन असूनही गावात फिरत होते..
  • गावात प्रचंड घाणीचे साम्राज्य आढळून आले..
  • गावातील महिला वर्गात ग्रामपंचायत कारभाराविषयी प्रचंड संताप दिसून आला..
  • गावात आधीच घाणी मुळे मलेरिया चे चार रुग्ण आहेत या पार्श्वभूमीवर स्वच्छता नाही..
  • कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही उपाय योजना करण्यात आली नाही..
  • ग्रामस्थांनी वारंवार केल्या तक्रारी गाव न्यायाच्या प्रतीक्षेत…

वरील सर्व प्रकारामुळे अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे किती लक्ष आहे हे ही दिसून आले. ग्रामसेविकेचे उद्धट उत्तर कशाचा परिपाक आहे?अधिकाऱ्यांचा वरदहस्त की पैश्या6गुर्मी हे समजले नाही.याच ग्रामसेविके कडे जवळच असलेल्या सुंदरपट्टी या गावाचा ही चार्ज आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासकीय आदेशानुसार सर्व ग्राम पंचायती सतत सुरू ठेवून ग्रामसेवक, पोलीस पाटील शिपाई यांनी ग्रामस्थांच्या सोई साठी,कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी गावातच मुख्यालय8उपस्थित राहणे आवश्यक आहे.या नुसार संबंधित ग्रामसेविका हेडावे येथे उपस्थित नसून चोपडा येथे होत्या या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर शिस्त भंगाची कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button