Amalner

??? ठोस प्रहार चा दणका …स्टेट बँक आली ठिकाणावर ग्राहकांसाठी केली सावलीची सोय

?? ? ठोस प्रहार चा दणका …स्टेट बँक आली ठिकाणावर ग्राहकांसाठी केली सावलीची सोय..

संदीप सैंदाने

अमळनेर

येथील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या बेजबाबदार ग्राहकांकडे दुर्लक्ष करण्याच्या बाबतीत ठोस प्रहारने 3 दिवसांपूर्वी बातमी प्रसिद्ध केली होती. ठोस प्रहारचे प्रतिनिधी संदीप सैंदाने यांच्या वृत्तांकना नुसार स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेकडो खातेदार आहेत. दररोज अनेक स्त्री पुरुष,दिव्यांग, वृद्ध,तरुण इ वेगवेगळ्या कामा निमित्ताने बँकेत येत असतात.सध्या उन्हाचा तडाखा देखील अचानक पणे वाढला आहे.

??? ठोस प्रहार चा दणका ...स्टेट बँक आली ठिकाणावर ग्राहकांसाठी केली सावलीची सोय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँक अत्यावश्यक सेवेत असून येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची काळजी घेणे हे बँक प्रशासनाचे कर्तव्य आहे. याबाबतीत स्टेट बँक पूर्ण पणे ग्राहकांकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले होते. ठोस प्रहारच्या प्रतिनिधींनी भेट देऊन वारंवार परिस्थितीची पाहणी केली असता लोक भर उन्हात बँकेच्या बाहेर उभे राहतात आणि बँक शाखा प्रबंधक याकडे लक्ष देत नाहीत अशी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. परिणामी आज रोजी स्टेट बँकेच्या बाहेर ग्राहकांसाठी मंडप टाकून सावलीची व्यवस्था करण्यात आलेली आढळून आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button