मोटर सायकलला धडक 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू
पारोळा प्रतिनिधी कमलेश चौधरी
पारोळा येथे दि. 10 रोजी सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी रा म सहावर सारवे गावाजवळ एका मोटर सायकल ला दुसऱ्या मोटर सायकल ने धडक दिल्याने यात विटनेर येथील 26 वर्षीय भाजीपाला विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला. या बाबत सोमनाथ प्रेमराज पाटील रा. विटनेर याने फिर्याद दिली की तो त्याचा चुलत भाऊ पुंडलिक रामसिंग पाटील यांचे सोबत पारोळा येथे भाजीपाला व फळ विक्री चा व्यवसाय करतात. दि 10 रोजी ते दोघे आपल्या मोटर सायकल क्रमांक एम एच 19 सी जी 8903 ने सकाळी 5 वाजता पारोळा येथे भाजीपाला खरेदी करून घरी परत येत असताना, ठीक 7 वाजून 15 मिनिटांनी पारोळा कडून एरंडोल कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मो सायकल क्रमांक एम एच 18 बी एन 3321 ने त्यांच्या मोटर सायकल ला जोरदार धडक दिल्याने त्यांचे वाहन अनियंत्रित होउन खड्डयात जाऊन पडली. यात पुंडलिक रामसिंग पाटील यास डोक्यास जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला यावेळी धडक देणाऱ्या मोटर सायकल स्वराने आपले वाहन जागीच सोडून फरार झाला. या बाबत सदर आरोपी मो सायकल स्वार नाव गाव माहीत नाही चे विरोधात गुन्हा दाखल होऊन पुढील तपास प्रकाश चौधरी करत आहे.






