Kolhapur

कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे उद्या नेत्र तपासणीसह रक्तदान शिबीर

कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे उद्या नेत्र तपासणीसह रक्तदान शिबीर

सिद्धगिरी हॉस्पिटल , सीपीआर ब्लड बँक , रोटरी क्लब सनराईजचा सहभाग

कोल्हापूर प्रतिनिधी अनिल पाटील

कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने गुरूवार दि . २८ नोव्हेंबर रोजी नेत्र तपासणीसह रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . शहाजी कॉलेजसमोरील कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्यालयात सकाळी साडेदहा ते दुपारी अडीचपर्यंत होणाऱ्या या उपक्रमात सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी , सीपीआर ब्लड बँक आणि रोटरी क्लब सनराईजचा सहभाग असणार आहे . शहर वाहतूक नियंत्रक पोलिसांचीही नेत्र तपासणी यावेळी करण्यात येणार आहे . रोटरी क्लब ऑफ सनराईजने सिद्धगीरी हॉस्पिटलला दिलेल्या अत्याधुनिक फिरत्या वाहनावरील संगणीकृत नेत्र तपासणी युनिटद्वारे अगदी बिनचूकपणे डोळ्याची तपासणी करून नंबर काढले जाणार आहेत . तसेच मोतिबिंदूसह इतर डोळ्याच्या विकारासंदर्भात यथोचित मार्गदर्शनही केले जाणार आहे . या शिबीरातून तपासणी केलेल्या आणि ऑपरेशनची गरज असलेल्यांना रोटरी क्लब सनराईजतर्फे सिद्धगिरी हॉस्पिटलतर्फे पुढील उपचार केले जाणार आहेत . तसेच आवश्यकतेनुसार नंबराचे चष्मेही दिले जाणार आहेत . यासाठी रोटरी क्लब ऑफ सनराईजचे अध्यक्ष प्रविण कुंभोजकर , सचिव मकरंद मुल्हेरकरसह संचालकांचे सहकार्य लाभत आहे . सिद्धगिरीचे नेत्रतज्ञ विरेंद्र वणकुद्रे आणि त्याच सहकारी डोळे तपासणी करणार आहेत . सीपीआर ब्लड बँकेच्यावतीने रक्त संकलित केले जाणार असून रक्तदात्यांना प्रमाणपत्र तात्काळ दिले जाणार आहे . तसेच महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय ब्लड बँकेत रक्तदात्यांच्या कुटुंबियांसाठी रक्ताची गरज असल्यास उपयोगी येणारे बारकोडिंगचे कार्ड रक्तदात्यांना मिळणार आहे . सध्याची रक्ताची टंचाईची परिस्थिती लक्षात घेवून अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने अध्यक्ष मोहन मेस्त्री यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button