पेठ

बाल आनंद मेळावा(दिपोत्सव)आनंदात साजरा

बाल आनंद मेळावा(दिपोत्सव)आनंदात साजरा

विजय देशमुख

जिल्हा परिषद शाळा
आसदनपाडा तालुका पेठ येथे विद्यार्थांचा बाल आनंद मेळावा(दिपोत्सव) मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. त्या ठीकाणी आसदनपाडा,वखारपाडा,डुक्करभुजी ,मेंढपाडा,महाविहिर या शाळेतील विद्यार्थी बाल गोपाल मोठ्या संखेने उपस्थीत होते.दिपावलीच्या निमिताने गुरुजनांनी विद्यार्थांसाठी ऐक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजीत केला होता. की बाळ गोपाळांसंगे दिपोत्सव आनंद मेळावा साजरा करतांना ऐक वेगळाच आनंद मीळत असतो. तो आज या कार्यक्रमा प्रसंगी बघावयास मिळाला.

या कार्यक्रमासाठी ढोल,पावरी हे वाद्य आनण्यात आले होते.आदिवासी परंपरने ढोल,पवरीच्या तालावर विद्यार्थांनी ऐकच ठेका धरला होतो.विद्यार्थांनी या कार्यक्रमा प्रसंगी खुप धमाल केली .विद्यार्थांच्या चेहऱ्यावर ऐक आनंद दिसत होता. विद्यार्थांना मिठाई वाटुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी गुरुजनांचे मोठे सहकार्य लाभले.बोरसे सर, गायकवाड सर,चौधरीसर,गवळी ताई ,गावित ताई सह सर्व शाळेंचे शिक्षक पालक, महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थीत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button