प्रशांत वाघे यांचे घर जळुन खाक
ज्ञानेश्वर जुमनाके चिमूर
नेरी दि.३ : चीमुर तालुक्यातील
नेरी येथील रहीवासी प्रशांत मधुकर वाघे यांचे घराला आग लागुन घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने फार मोठे आर्थिक नुकसान झाल्याची घटना घडली आहे
३ डिसेंबर ला रात्री साडेतीन वाजताचे सुमारासची घटना आहे
ही आग नेमकी कशामुळे लागली हे कळु शकले नसले तरी या आगीमध्ये घरातील जिवनोपयोगी वस्तू तांदूळ गहु, कपडे लत्ते,कुलर घरातील महत्वाचे कागद पत्रे,पैसे वगैरे जळुन खाक झाल्याने प्रशांत वाघे यांचेवर जीवन चरिथ्राचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे
या आगीमध्ये सुदैवाने जिवीत हानी टळली आहे
नवरगाव रोड वरील नानाजी पिसे ले-आऊट मधील ही घटना आहे
नेरी भाजपा कार्यकर्ते संदीप पिसे व संदेश पंधरे यांनी घटनास्थळी जाऊन आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना कळविले आमदार महोदयांनी दूरध्वनीवरून प्रशासनाला माहिती कळवली. व तात्काळ योग्य ती मदत देण्यास सांगितले.






