Pune

? मोठी बातमी..” कोरोना से मारेंगे कम , लॉक डाऊन से मारेंगे हम “, पुण्यात व्यापाऱ्याचे मानवी साखळी आंदोलन

? मोठी बातमी..” कोरोना से मारेंगे कम , लॉक डाऊन से मारेंगे हम “, पुण्यात व्यापाऱ्याचे मानवी साखळी आंदोलन

पुणे : ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधाचा पुण्यातील व्यापारी संघटनांनी विरोध केला आहे. काही दिवस किंवा काही तास तरी दुकाने सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करत आहेत. ”कोरोना से मरेंगे कम, लॉकडाऊन से मरेंगे हम” अशा घोषणा देत पुण्यात व्यापाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. लक्ष्मी रस्ता. सोन्या मारुती चौक, नाना पेठ ते अलका चौक या ठिकाणी मानवी साखळी करुन व्यापारी संघटनानी आज आंदोलन केले. ”दुकाने उघडण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, या मागणीसाठी व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. शहरातील सुमारे १० लाख कामगार दुकानांवर अवंलंबून आहेत. तसेच सणांच्या दिवसात व्यापार कोसळला तर पुन्हा उभारी घेण्यास प्रदीर्घ काळावधी जाईल आणि त्यातून अतोनात नुकसान होईल.

तसेच ग्राहकांनाही या बंदचा मोठा फटका बसत असल्याचे व्यापाऱयांचे म्हणणे आहे. दरम्यान दुपारी 12 वाजता पोलिसांनी व्यापाऱ्यांना घरी जाण्यास सांगितले आहे.
व्यापारी असोसीएशन चे व्यापारी आपल्या दुकांनासमोर, हातात बॅनर हातात घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. सरकारच्या कडक निर्बंधाचा व्यापाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. सातत्याने लावल्या जाणाऱ्या कडक निर्बंधामुळे व्यापाराचे मोठे नुकसान होत आहे. सण जवळ आले आहेत, गुढीपाडवा काही दिवसांवर आहे. त्यासाठी दुकानात भरलेला मालाची विक्री कशी होणार? आमचे काय होणार? आमची दुकाने कोणत्याही परिस्थिती चालू करण्याची परवानगी द्या. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे आधीच व्यापाऱ्यांना 50 टकके तोटा झालेला आहे. आता पुन्हा लॉकडाऊन लादून तुम्ही आम्हाला संकटाच्या खाईत लोटू नका अशी विनवनी व्यापारी करत आहे.

दुकानदारांवर आर्थिक आरिष्ट्य
कोरोनामुळे सलग २५ दिवस दुकाने, व्यवसाय बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने दिल्यामुळे बाजारपेठेवर आर्थिक आरिष्ट कोसळले आहे. पुण्याच्या रिटेल क्षेत्राचा आढावा घेतला तर, किमान १० लाख लोकसंख्या त्यावर थेट अवलंबून आहे. त्यामुळेच दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाचा राज्य सरकारने फेरविचार करावा, अशी आग्रही मागणी या क्षेत्रातून तीव्रपणे होत आहे.

लहान- मोठ्या दुकानांची संख्या ..सुमारे १ लाख २५ हजार
– अधिकृत, अनधिकृत स्टॉल व्यावसायिकांची संख्या ः सुमारे ५० हजार
– पथारी व्यावसायिकांची संख्या नोंदणीकृत ः २८ हजार
– महापालिकेकडे नोंदणी नाही ः १४ हजार
– दुकानांतील कामगारांची संख्या ः सुमारे ६ लाख
– छोट्या व्यवसायांवर अवलंबून असलेल्यांची संख्या ः ४ लाख
– कामगारांचे सरासरी वेतन ः ८ ते २५ हजार
– स्टॉल व्यावसायिकांचे मासिक सरासरी उत्पन्न ः १२ ते २० हजार
– पथारी व्यावसायिकांचे मासिक उत्पन्न ः १५ ते १५ हजार

प्रश्न काय
– मालाचे पैसे कसे द्यायचे
– कामगारांचे पगार कसे देणार
– बॅंकांचे हप्ते कसे फेडणार
– दुकानाचे भाडे, लाईट बिल कसे भरणार
– विविध करांचा भरणा कसा करणार
-चरितार्थ कसा चालविणार

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button