? Big Breaking… उभारी योजनेअंतर्गत मौजे कुऱ्हे खुर्द येथे आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला धनादेश सुपूर्त…अमळनेर प्रा जयश्री दाभाडेउभारी कार्यक्रमांतर्गत आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता म गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मौजे कुऱ्हे खुर्द ता. अमळनेर येथील कै. भिमराव सुपडू वडर ( शिंदे ) आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे,तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी भेट दिली .
यावेळी विहित नमुन्यातील माहिती संकलित करण्याचे कामकाज सुरू करण्यात आलेले आहे. तसेच शासकीय मदतीचा धनादेश मा सीमा अहिरे प्रांत मॅडम यांचे हस्ते सदर कुटुंबातील सदस्यांना देण्यात आला आहे. सोबत अमळनेर तालुक्याचे तहसितदार मिलिंदकुमार वाघ, नायब तहसिलदार योगेश पवार, महसुल सहाय्यक संदिप पाटील, तलाठी कऱ्हे खुर्द महेश अहिरराव,कोतवाल पिरनगजरे उपस्थित होते.






