Amalner

?अमळनेर प्रशासन मिडीयाला का ठेवत आहे दूर…लोकशाहीचा चौथा स्तंभ पोहचतो जन सामान्यांपर्यंत

? अमळनेर प्रशासन मिडीयाला का ठेवत आहे दूर…समाजाचा चौथा स्तभ पोहचतो जन सामान्यांपर्यंत…

अमळनेर

जळगांव जिल्ह्यातील हॉट स्पॉट शहर म्हणून अमळनेर तालुका घोषित होण्याच्या मार्गावर आहे. कोरोना विषाणू च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाय योजना राबविण्यात येत आहेत.परन्तु अमळनेर प्रशासन पत्रकारांना विश्वासात न घेता परस्पर वाटचाल करीत आहे.

पत्रकार हा व्यवस्थेचा चौथा मजबूत स्टंभ आहे.आणि प्रिंट ,इलेक्ट्रॉनिक मिडीया लोकां पर्यंत लवकर तर पोहचतातच विशेष म्हणजे ती माहिती अधिकृत आणि विश्वसनीय असल्याची लोकांना खात्री असते. सध्या ऑनलाईन पोर्टल मुळे काही सेकंदात बातमी प्रकाशित करून लाखो लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहचविता येते.

अमळनेर प्रशासन मात्र गेल्या 22 मार्च पासून लॉक डाऊन सुरू तेंव्हा पासून पत्रकारांना विश्वासात घेत नसल्याचे चित्र दिसत आहे. तरीही अमळनेर शहरातील सर्व पत्रकार सामाजिक बांधिलकी जपत जी माहिती तालुका पातळीवर मिळायला हवी ती जिल्हा पातळीवर घेऊन आपल्या पद्धतीने लोकांना जागृत करत आहेत. तसेच शासकीय अधिकारी हे कमी वेळा साठी शहरात आलेले असतात परन्तु पत्रकार हे स्थायिक आहेत तालुक्यातील प्रत्येक भागात ओळख आहे त्यामुळे बहुतेक माहिती स्थानिक पातळीवर लोकांकडून पत्रकारांना मिळत आहे. अधिकाऱ्यांना सामान्य लोक घाबरतात त्यामुळे विविध प्रकारची माहिती पत्रकारांना मिळत आहे त्याची खातरजमा करून अधिकारी,कर्मचारी आणि जनता यांच्या पर्यंत ती माहिती पोहचवीत आहेत.आणि आपलं कर्तव्य पार पाडत आहेत.अनेक पत्रकार फिल्ड वर सतत कार्यरत आहेत.यामागील उद्देश पूर्ण पणे प्रशासनाला मदत करणे,लोकांपर्यंत योग्य माहिती देणे की जेणे करून सर्वांच्या सहकार्याने या आपत्ती च्या काळात कोरोना विषाणूच्या महामारी पासून सुरक्षित राहता येईल आणि विजय मिळवता येईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button