Amalner

?️ मा.आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी कसा जपला पारंपरिक गणेशोत्सव वारसा…तरुण पिढीने ही जपावा हा वारसा व्यक्त केली अपेक्षा..

?️ मा.आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी कसा जपला पारंपरिक गणेशोत्सव वारसा…तरुण पिढीने ही जपावा हा वारसा व्यक्त केली अपेक्षा..

अमळनेर

सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत आहे आणि या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कलम शासनाने लागू करण्यात आले आहे. या कारणामुळे या वर्षी गणेशोत्सव साजरा करताना विविध प्रकारचे नियम लागू करण्यात आले आहेत.

या सर्व परिस्थितीत माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी आपलं वेगळे पण जपत पर्यावरण पूर्वक गणपती बसवून गणेशोत्सव साजरा केला. गेल्या अनेक वर्षांपासून मा आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील हे गणेशाची प्रतिष्ठापना करतात आणि विधी वत विसर्जन ही करतात.पण यावर्षी कोरोनाच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गणेशोत्सव वाची परंपरा खंडित होवू दिली नाही . यावर्षी गणेशाची मूर्ती न घेता मा आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी विड्याच्या पानावर सुपारी ठेवून गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत विधिवत पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा आराधना केली. आणि आज एका पानावर असलेली सुपारी रुपी गणपती बाप्पा विसर्जनासाठी प्रशासनाच्या हवाली केला.

प्राचीन काळापासून गणेशाचे रूप म्हणून विड्याच्या पानावर असलेली सुपारी ही सर्व धार्मिक विधींमध्ये समाविष्ट केली जाते. ही अत्यन्त प्राचीन परंपरा असून गणेशाच्या मूर्तीची आराधना करणे किंवा प्रतिष्ठापना करणे ही प्रथा नंतरच्या काळात सुरू झाली. पण पर्यावरण आणि निसर्ग पूजक हे नेहमीच या विधी आणि परंपरेला मानत आले आहेत.

वेगवेगळ्या प्रकारच्या माती तुन विविध रंगानी युक्त ह्या गणेशाच्या मुर्त्या पर्यावरणाला खूपच हानिकारक असतात.ह्या मूर्त्यांचं विसर्जन नदी,तलाव,समुद्र यात केल्या मुळे पण जल प्रदूषण नियमित पणे होत असते.

नेहमीच आपल्या वेगळ्या शैली आणि हटके कामकाजासाठी मा आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील हे चर्चेत असतात.यावेळी मात्र अत्यन्त वेगळ्या प्रकारे श्री गणेशाची आराधना करून त्यांनी नव्या पिढीला एक आदर्श निर्माण करून दिला आहे.

तरुण पिढी ने ही हा वारसा जपला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी आज ठोस प्रहार शी बोलतांना व्यक्त केली. यामुळे पर्यावरणाचे ही संरक्षण संवर्धन होईल आणि प्राचीन परंपराही जपल्या जातील.असे ही ते म्हणाले.प्रत्येकाने याच पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा आता कोव्हीड 19 मुळे आपण पुन्हा वेगवेगळ्या माध्यमातून का असेना पण जुन्या परंपरा कडे वळत आहोत.आणि आता पुन्हा ह्या परंपरा जतन करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button