?️ Big Breaking अमळनेरात अजून एक कोरोना पॉझिटिव्ह
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
जळगाव : येथील कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना संशयित रुग्णांपैकी काल रात्री एका रुग्णाचा नमुना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन एस चव्हाण यांनी दिली आहे.
या कोरोना बाधित रुग्णाचे वय 74 वर्ष असल्याचे सांगितले जात असून अमळनेरात रुग्णांची संख्या एकूण 4 वर पोहचली आहे. मात्र एवढे रुग्ण आढळून आले असूनही प्रशासन मात्र जागृत होतांना दिसत नाही. म्हणून प्रशासनाने अमळनेर 100 टक्के बंद करायला हवे व भाजीपाला तसेच किराणा दुकादारांना गर्दी न होऊ देण्याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी होत आहे.






