?️अमळनेर कट्टा…निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कामांना जबाबदार कोण..? नगरपरिषद की ठेकेदार..?चल रे भाऊ आपण मिळुन खाऊ…!ची कार्यप्रणाली..
नागरिकांच्या टॅक्स रुपी पैशाची उधळपट्टी करणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी माझ्या परिसरात येऊ नये अन्यथा ओल्या बांबूचे फटके दिले जातील……. असा सूचनावजा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी दिला आहे.

गजानन कॉलोनी सांड पाणी गटार ठेकेदार गणेश ठाकरे यांनी मागील वर्षी ही गटार बांधण्याचा टेंडर घेतले इस्टिमेट सुमारे 30 ते 34 लाख आज ह्या गटारीची हालत बघा सेफ्टी ढाबे आपोआप जीर्ण होऊन चेंबर यांना तळे जात आहे हे काम अजून 2 वर्षात यापेक्षा ही विद्रुप होईल म्हणजे नागरिकांच्या पैशाची सरेआम उधळ पट्टी करण्यात आली असेच काही. ह्या पापाचा वाटेकरी कोण? न. पा. कि ठेकेदार?
म्हणून सामाजिक कार्यकर्ता अनंत निकम यांनी त्यांच्या फेसबुक पेज वरून निकृष्ट कामाचे फोटोस व्हायरल करत समंधित निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना ” नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या ठेकेदारांना परिसरात आल्यावर ओल्या बांबूचे फटके मारू ” अशी सूचना दिली आहे.







