Amalner

?️अमळनेर कट्टा…पाईप लाईन मध्ये पडून एकलहरे येथे एकाचा मृत्यू..!मारवड पोलीस ठाण्यात  अकस्मात मृत्यूची नोंद

?️अमळनेर कट्टा…पाईप लाईन मध्ये पडून एकलहरे येथे एकाचा मृत्यू..!मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

अमळनेर तालुक्यातील एकलहरे येथे एका व्यक्तीचा चेंबर मध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मयत व्यक्तीचे नाव हिंमत पाटील असे असून वय 41 वर्षे एव्हढे आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी महेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा चुलत भाऊ हिंमत श्रीराम पाटील हा त्याचे परिवारासह राहतो.त्याची शेती एकलहरे शिवरात शेत गट नं 192/1ब मध्ये असुन ती शेती तो पेरतो.आज दि.25/06/2021 रोजी सकाळी 11.00 वा.चे सुमारास चुलत भाऊ नामे हिंमत श्रीराम पाटील हा नेहमी प्रमाणे वर नमुद शेतात काम करण्यासाठी गेला होता.व त्यांची पत्नी प्रतीभा हिंमत पाटील ही हिंमत यांचे बाजुच्या शेतात रोजंदारीने कामाला होती.हिमंत शेतात काम करीत असतांना प्रतीभा हिला तो दिसत
होता.पण ब-याच वेळ झाला हिंमत काम करतांना शेतात दिसला नाही म्हणुन प्रतीभा हीने दुपारी 03.30 वा.चे सुमारास चुलत भाऊ हिंमत यांचे शेतात जावुन पाहीले असता प्रतिभा हीला हिंमत शेतातील पाईप लाईनचे चेबर मध्ये पडलेला दिसला.तेव्हा प्रतिभा हीने आजुबाजुला शेतात काम करीत असलेल्या शेतक-याना आवाज देवुन तेथे बोलावून घेतले.तेव्हा हनुमंत यादव पाटील,विकास विश्वास पाटील,अनिल बारकु पाटील यांनी हिंमल याला चेबंर मध्ये पडलेल्या अवस्थेत पाहुन हिंमत यास शेतातुन खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे दाखल केले नंतर तेथील डॉक्टरांनी हिंमत यास तपासुन मयत घोषीत केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button