Amalner

?️अमळनेर कट्टा.. अमळनेर नगरपरिषदेतील 504 कर्मचाऱ्यांचा विमा..!

?️अमळनेर कट्टा.. अमळनेर नगरपरिषदेतील 504 कर्मचाऱ्यांचा विमा..!

अमळनेर येथील नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांचा आपत्ती काळ लक्षात घेता विमा काढण्यात आला आहे. अध्यक्षा जिजामाता कृषिभूषण सौ. पुष्पलता साहेबराव पाटील व महाशय मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी कोव्हीड-१९ अंतर्गत अमळनेर न.प. अधिकारी व कर्मचारी यांनी उत्कृष्ट काम केल्या मुळे तसेच कोव्हीड-१९ उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एक दिवसाचा पगार स्वखुषीने जमा करण्याच्या कार्यास हातभार लावला हे लक्षात घेऊन लोकनियुक्त नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी नगरपरिषदेतील एकूण ५०४ अधिकारी व कर्मचारी यांचा ओरिएंटल इन्शुरन्स लिमिटेड मार्फत प्रति वर्ष प्रति कर्मचारी 120/- रुपये असा 3 वर्षासाठी एकूण 1,81,000/- रुपयांचा धनादेश देऊन अपघात विमा काढला. त्यात अपघातात मरण पावल्यास 2 लक्ष रुपये व कायमस्वरूपी विकलांगता आल्यास 1 लक्ष रुपये असे लाभ आहेत.यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता सौ.पुष्पलता साहेबराव पाटील,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड,प्रशासन अधिकारी संजय चौधरी,कर्मचारी संघटना अध्यक्ष अनिल बेडवाल, सोमचंद संदांशिव, राजू चंडाले, प्रसाद शर्मा तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नगरपालिका व नगराध्यक्षा यांनी घेतलेल्या या निर्णयाचे कर्मचारी वर्गाने समाधान व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button