?️अमळनेर कट्टा…Breaking.. अमळनेर स्टेट बँक मध्ये आग..!अग्निशामक दल घटनास्थळी दाखल…
कर्मचाऱ्यांची पत्रकारांना अरेरावी..!
अमळनेर येथील स्टेट बँकेत रात्री 11 वाजता आग लागल्याची घटना घडली आहे. बँकेच्या आतल्या बाजूने धूर निघत असल्याचे प्रत्यक्ष दर्शी व्यक्तींना दिसले येथे सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते. धूर कुठून निघत आहे हे सुरुवातीला लक्षात आले नाही.नागरिकांच्या मदतीने खिडक्या उघडण्यात आल्या.अग्निशामक दलास बोलविण्यात आले.येथे लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी पाण्याचे फवारे मारण्यात आले. विशेष म्हणजे प्रत्यक्ष आग लागलेली दिसून आली नाही. पाणी मारल्या मुळे कागदपत्रे ओली झाली आहेत आणि नुकसान झाले आहेफक्त धूर मात्र मोठ्या प्रमाणात निघत होता.यामागे काय कारण असेल हे अजून कळले नाही परंतु शॉर्ट सर्किट मुळे हा प्रकार घडला असावा असे प्रथम दर्शनी वाटत आहे. यावेळी पत्रकारांना धक्काबुक्की आणि अरेरावी ची भाषा बँक कर्मचाऱ्यांनी वापरली असा देखील प्रकार घडला आहे.काय काळ बेरं असू शकत यामागे अशी चर्चा सुरू आहे.स्टेट बँकचे शाखा प्रबंधक आग लागण्यापूर्वी काही वेळ आधी तिथे होते असेही एका प्रत्यक्ष दर्शी व्यक्ती ने सांगितले आहे. खरं काय ते उद्या तपासा अंती समजेलच







