Amalner

?️अमळनेर कट्टा..Breaking…वाळू माफियांबरोबरच रेशन माफिया देखील हिरेंच्या निशाण्यावर..!तांदुळाने भरलेली आयसर घेतली ताब्यात….

?️अमळनेर कट्टा..Breaking…वाळू माफियांबरोबरच रेशन माफिया देखील हिरेंच्या निशाण्यावर..!तांदुळाने भरलेली आयसर घेतली ताब्यात….
अमळनेर येथे वाळू माफियांप्रमाणेच रेशन माफिया जोरात ब्लॅक ने रेशन चा तांदूळ,गहू विकून गोर गरिबांच्या तोंडातील घास काढून घेतात.शासकीय नियमांप्रमाणे वाटप न करता ब्लॅक ने तांदूळ बाजारात विकतात.हा खूप मोठा घोटाळा असून अमळनेर तालुक्यात रेशन माफियांचे खूप मोठे रॅकेट कार्यरत आहे.यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आवाज उठवून न्याय मागण्याचा देखील प्रयत्न केला आहे. आणि काही दुकाने देखील सील केली आहेत.पण महसूल प्रशासन सुस्त असून रेशन माफियांवर जबरदस्त वरदहस्त आहे.संपूर्ण महसूल मॅनेज असून किती कसे हप्ते जातात हे देखील अमळनेर च्या सुज्ञ नागरिकांना माहीत आहे.
आज मात्र महसूल प्रशासनावर मात करत पो निरीक्षक जयपाल हिरे यांनी वाळू माफियांबरोबरच रेशनच्या तांदुळाने भरलेली आयसर ताब्यात घेतली आहे. सदर गाडी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. गाडी no MH 18 BG 0745 असा असून धुळे रस्त्यावर सदर गाडी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने पकडली आहे.साधारणपणे 60 ते 70 तांदळाच्या गोण्या असल्याची माहिती मिळाली आहे.
आज सकाळी ०८.०० वा धुळे-अमळनेर-चोपडा मार्गे रेशन तांदुळ व पोषण आहाराचा माल वाहतूक करणारी आयशर ट्रक गोपनीय माहीती मिळाल्याने अमळनेर पोस्टेला आणली आहे. महसूल विभागातील पुरवठा अधीकारी यांचेशी पत्रव्यवहार करून गुन्हा दाखल करत आहोत. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॅा. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक श्री सचीन गोरे व उपविभागीय पोलीस अधीकारी श्री राकेश जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोनि जयपाल हिरे, पोहवा संजय पाटील, दिपक विसावे, पोना दिपक माळी, चालक पोकॅा सुनिल पाटील यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button