?️अमळनेर कट्टा.. Big Breaking.. शिवजयंतीवर कोरोना बरोबरच पावसाचे आस्मानी संकट..!तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी..!
अमळनेर येथे रात्री 8 वाजेपासून जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. सकाळ पासूनच वातावरण खराब होते. उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असून शिवजन्मोत्सव यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्यदित स्वरूपात साजरी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांत जळगांव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढले असल्याची आकडेवारी समोर येत आहे.या पार्श्वभूमीवर काल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून कोव्हिडं 19 चे नियम पाळणे बंधनकारक केले आहे.परिणामी संपूर्ण जळगांव जिल्ह्यातील च नव्हे तर महाराष्ट्रात शिव जन्मोत्सव कार्यक्रमांचे स्वरूप बदलले आहे. मिरवणुकी निघणार नसून शक्यतो जागेवरच कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामुळे तरुण मंडळीतील उत्साह मात्र कमी झाला आहे.दरवर्षीप्रमाणे चा जल्लोष आनंद यावर्षी दिसून येत नाही. आणि पाहिजे तसे विधायक कार्यक्रम ही राबविता येत नाहीत अशी खंत तरुणांनी व्यक्त केली आहे. तरीही जागेवरच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यातच काल पुणे वेध शाळेने वर्तविलेल्या हवामान अंदाजा प्रमाणे आज महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ढंगाच्या गडगडाटासह विजेने ही रुद्र रूप धारण केले आहे. अमळनेर तालुक्यातअवकाळी पावसाची जोरदार सुरुवात झाली असून उद्याच्या शिव जयंतीच्या कार्यक्रम तयारीला यामुळे ब्रेक लागला आहे. यामुळे कोरोना बरोबरच पावसाचे आस्मानी संकट शिव जन्मोत्सवावर घोंगावत आहे.तरुण पिढी नाराज झाली असून थोड्या फार प्रमाणात सुरू असलेली तयारी पावसामुळे थांबून गेली आहे. उद्या मात्र सकाळी आणि संध्याकाळी विविध कार्यक्रम शांततेत व विना पावसाचे पार पडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






