Amalner

?️अमळनेर कट्टा..अमळनेरच्या “विजय” ने मिळवला मृत्यूवर विजय..! वाचविले महिलेचे प्राण…!बोले तो रिअल सिंघम…!

?️अमळनेर कट्टा..अमळनेरच्या “विजय” ने मिळवला मृत्यूवर विजय..! वाचविले महिलेचे प्राण…!बोले तो रिअल सिंघम..!

अमळनेर : दादर मुंबई येथे धावत्या रेल्वेत चढताना रेल्वे आणि प्लॅटफॉर्म च्या मध्ये अडकत असलेल्या महिलेला आपल्या स्फूर्ती ने एका क्षणात बाहेर काढून अमळनेरच्या पोलिसाने प्राण वाचविले.

याबाबतीत सविस्तर माहिती अशी की १३ जून रोजी रात्री ९ वाजून ३२ मिनिटांनी दादर रेल्वे स्टेशनवर हावड्याकडे जाणाऱ्या रेल्वे मध्ये चढताना एक महिला गाडीत चढण्याच्या प्रयत्नात पाय घसरून रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडली.एका क्षणात च ती घसरून रेल्वे खाली जाऊन तिचा जीव गेला असता.परंतु प्लॅटफॉर्म वर उपस्थित पोलीस विजय चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत चपळाईने त्या महिलेकडे धाव घेतली आणि तिला वाचविले. अमळनेर येथील सुभाष चौकातील रहिवासी व दादर रेल्वे स्टेशन चौकीवरील कॉन्स्टेबल विजय रमेश चव्हाण हे प्लॅटफॉर्मवर उभे होते. महिला पडल्याचे दिसताच त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता तात्काळ धाव घेतली आणि त्या महिलेला बाहेर काढले.विशेष म्हणजे महिलेला साधे खरचटले सुद्धा नाही. तिला मानसिक आधार देऊन पाणी पाजून विजय चव्हाण यांनी तिला रात्री दहा वाजेच्या गाडीने मनमाड कडे रवाना केले. विजयची समयसूचकता, धाडस,प्रसंगावधान,चपळाई आणि मदत करण्याची भावना याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button