?️अमळनेर कट्टा..धुळे रस्त्यावरील अमळनेर गेट ठरतंय धोकेदायक..!आज पुन्हा दुचाकी स्वाराचा अपघात..!सार्वजनिक बांधकाम खाते खेळतंय लोकांच्या जीवाशी..!
अमळनेर येथील धुळे रस्त्यावर अमळनेर प्रवेशद्वाराचे काम सुरू असून ह्या ठिकाणी वारंवार अपघात होण्याची संख्या वाढली आहे. गेल्या महिन्या भरात 5 ते 6 अपघात या प्रवेशद्वारा जवळ झाले आहेत. हे सर्व अपघात प्रशासनाच्या चुकीमुळे होत आहेत. ह्या प्रवेशद्वाराच्या बांधकामा ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सूचना फलक लावलेला नसून रेडियम साइन देखील लावलेले नाहीत.इथे अंधार असतो आणि काम सुरू आहे हे देखील कळत नाही पर्यायाने समोरून येणारा सरळ ह्या अर्धवट बांधकामावर आदळतो आणि जखमी होतो.असाच प्रकार आज घडला असून दुचाकी स्वार सरळ बांधकामावर आदळाल्याने जखमी झाले आहेत. दुचाकी चे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.पण जखमींना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
या प्रवेशद्वाराच्या बांधकामा दरम्यान रिफ्लेकटर लावणे आवश्यक आहे. बॅरिगेट्स लावणे आवश्यक आहे. धुळे रोडवरून सतत वाहने ये जा करत असतात.आणि वाहतुक मोठ्या प्रमाणात होत असते या अनुषंगाने ह्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. गेल्या महिन्या भरात 5 ते 6 अपघात झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे.एव्हढा जुना विभाग यांना नियमांचे पालन करा.लोकांच्या जीवाशी खेळू नका हे सांगावे लागते.म्हणजे एव्हढे उच्च शिक्षित अधिकारी, कर्मचारी हे सांग कामे हर कामे आहेत का? जर कुणाचं काही बर वाईट झालं तर याला जबाबदार कोण राहील असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.लवकरात लवकर हे प्रवेशद्वार एकतर पूर्ण करावे आणि इथे आवश्यक त्या सर्व नियमानुसार फलक,इंडिकेटर, रिफ्लेकटर लावावेत अशी मागणी केली जात आहे.






