Amalner

?️ अमळनेर कट्टा… प्रभाग क्रमांक एक मध्ये आठवडाभरात गेला डझनभर लोकांचा जीव उपाययोजना करणारी पालिका हरवली काय?नगरसेवक नरेंद्र चौधरींचा संतप्त सवाल

?️ अमळनेर कट्टा… प्रभाग क्रमांक एक मध्ये आठवडाभरात गेला डझनभर लोकांचा जीव उपाययोजना करणारी पालिका हरवली काय?नगरसेवक नरेंद्र चौधरींचा संतप्त सवाल

अमळनेर : कोरोना प्रादुर्भावामुळे प्रभाग क्रमांक एक मधील,अयोध्या नगर,रामवाडी, तांबेपुरा,बंगाली फाईल, टाकी फाईल व केशव नगरासह परिसरातील कॉलनी भागात एकाच आठवड्यात सुमारे डझनभर म्हणजेच 12 लोकांचा जीव गेला असून तरी देखील न प च्या आरोग्य विभागाने या भागात स्वच्छतेसह इतर कोणत्याही उपयोजना न केल्याने या भागाचे नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगरसेवक नरेंद्र चौधरींनी म्हटले आहे की कोविड प्रादुर्भावात न प प्रशासनावर मोठी जवाबदारी असून येथील प्रशासन फक्त बंदचा नियम मोडणाऱ्यांकडून जबरी वसुली करणे,महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बैठका करून,काहीतरी करीत असल्याचा आव आणणे आणि आरोग्य टीमच्या सहकार्याने अँटीजन चाचणी कॅम्प घेणे एवढेच कार्य करताना दिसत असून याव्यतिरिक्त कोरोना महामारीसाठी कोणत्याही उपयोजना करताना दिसून येत नाही कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात रुग्ण आढळेल तेथे स्वच्छता मोहीम राबविणे,जंतुनाशक फवारणी करणे,बॅरिगेटिंग करणे,कॉन्टॅक्त ट्रेसिंग आणि टेस्टिंग करणे यासारखे उपक्रम अनेक दिवस राबविण्यात आले होते,आता मात्र बॅरिगेटिंग सोडाच साधी औषध फवारणी देखील होताना दिसत नाही कदाचित आताच कोरोना विषाणू औषध तथा सॅनिटायझर फवारणी ने मरत नसावा किंवा त्यावेळी न प ने ज्या उपयोजना केल्या तो मुर्खपणा असावा अशीच चर्चा आता जनतेमध्ये रंगू लागली आहे.
कोरोना महामारीत शहरात अनेकांचे जीव गेले असून आमच्या प्रभाग एक मध्ये तर अतिशय कमी वयाचे 12 जण मयत झाल्याने प्रभागातील जनता भयभीत झाली असून एवढे काही घडून देखील त्यांची हक्काची नगरपालिका नियमित स्वछता व्यतिरिक्त प्रभागात काहीच उपाययोजना करीत नसल्याने या महामारीत आपली पालिका हरवली का?असा प्रश्न आम्हाला जनता विचारू लागली आहे.ताडेपुरा सह इतर स्मशानभूमीत दररोजचे मृतदेह जाळले जात असताना पालिकेला तेथेही स्वछता करायला वेळ नाही यामुळे बाहेरचे कुणीतरी सामाजिक कार्यकर्ते येऊन स्वच्छता मोहीम राबवितात हे अत्यंत दुर्देव आहे. न प चे सामान्य कामगार व कर्मचाऱ्यांबाबतीत आमचा रोष नाही पण जे पालिकेचे कर्तेधरते आहेत त्यांना वसुली करून आपल्या लोकांची बिले काढण्यात आणि संकुल लिलाव करून काहीतरी पदरात पाडून घेण्यात अधिक रस असल्याने त्यांनी किमान या महामारीत आपल्या गावातील कुणाचातरी जीव जातोय याचे भान ठेवत थोड्याफार का असेना प्रभागात स्वच्छतेच्या उपयोजना राबवून जनतेला आधार द्यावा अशी मागणी नगरसेवक नरेंद्र चौधरींनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button