kalamb

कळंब उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रॅपिड टेस्ट किटचा तुटवडा

कळंब उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रॅपिड टेस्ट किटचा तुटवडा

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

रॅपीड टेस्ट कीट उपलब्ध करून द्या – भाई बजरंग ताटे .

कोरोना चा विळखा सध्या ग्रामीण भागात वाढत चालला आहे.कळंब तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १७२ पार झाला आहे.कोरोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांची सुध्दा तपासणी करण्यात येत आहेत.

परंतु कळंब आरोग्य विभागाकडे रॅपीड टेस्ट किट चा तुटवडा आहे.त्यामुळे तपासणी करण्यात विलंब लागत आहे.यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो मस्सा खं येथे काल ३ रुग्णं आढळले आहेत.मस्सा खं ग्रामपंचायत ने वेळोवेळी उपाययोजना केल्या आहेत.

परंतु उपजिल्हा रुग्णालय कळंब याच्या कडील रॅपीड टेस्ट किट स़ंपल्या आहेत . किट नसल्याने कोरोना ची लागण झाली आहे हे समजून येते नाही.यासंदर्भात लाल पँथर संघटनेचे अध्यक्ष भाई बजरंग ताटे यानी खासदार औमराजे निंबाळकर यांना, आमदार कैलास पाटील आरोग्य विभाग यांच्या कडे निवेदन देऊन मागणी केली आहे की कोरोना बांधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या वृध, कॅन्सरग्रस्त, विविध आजारग्रस्त ,लहान मुले ,याची टेस्ट करण्यासाठी रॅपीड टेस्ट कीट शासनाने तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावीत.

असे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की कोरोना बांधीत रुग्णांच्या संपर्कात असलेल्या वृध , कॅन्सरग्रस्त, विविध आजारग्रस्त ,लहान मुले यांची टेस्ट करण्यासाठी रॅपिड टेस्ट कीटचा कळंब तालुक्यात आलेला तुटवडा तात्काळ भरुन काढा..

कळंब उपजिल्हा रुग्णालयाला भुम तालुका येथुन शंभर रॅपिड टेस्ट किट मागून घेतल्या होत्या . परंतु आता कळंब शासकीय रुग्णालयाकडे रॅपीड टेस्ट कीट संपल्या आहेत अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी जाधव यांनी दिली.त्यामुळे आता किट चा तुटवडा निर्माण झाला आहे तरी कोरोनाचे निदान करण्यासाठी रॅपिड टेस्ट कीट तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी लाल पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे यांनी व जिल्हाध्यक्ष सौ माया शिंदे यांनी प्रशासनाकडे केली आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button