Amalner

?️ अमळनेर कट्टा… पांझरा नदीतील अवैध वाळु उपसा करणाऱ्यांवर कारवाई करून अवैध वाळु उपसा थांबवून मांडळ गावालगत पांझरा नदीच्या दोन्ही काठांवर चेकपोस्ट लावण्यात यावे अमळनेर काँग्रेस कमिटीची मागणी

?️ अमळनेर कट्टा… पांझरा नदीतील अवैध वाळु उपसा करणाऱ्यांवर कारवाई करून अवैध वाळु उपसा थांबवून मांडळ गावालगत पांझरा नदीच्या दोन्ही काठांवर चेकपोस्ट लावण्यात यावे अमळनेर काँग्रेस कमिटीची मागणी

अमळनेर : मांडळ गावालगत असलेल्या पांझरा नदीतील अवैध वाळु उपसा करणाऱ्यांवर कारवाई करून अवैध वाळु उपसा थांबवून मांडळ गावालगत पांझरा नदीच्या दोन्ही काठांवर चेकपोस्ट लावण्यात यावे अशी मागणी अमळनेर काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन तहसीलदार मिलींद वाघ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. सदर मागण्यांबाबत पुढील दोन दिवसात कारवाई करण्यात येईल असे आश्वासन यावेळी तहसीलदार अमळनेर यांच्याकडून देण्यात आले. यावेळी अमळनेर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक मनोज पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील, शहराध्यक्ष तौसिफ तेली,शहरकार्याध्यक्ष कुणाल चौधरी, इद्रिस बागवान, अल्पसंख्याक सेल तालुकाउपाध्यक्ष राजु भाट, मांडळचे ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन पवार, ग्रामस्थ रमेश पाटील, आकाश पाटील, मुरलीधर कोळी, कुणाल पाटील, प्रमोद पाटील, घनश्याम महाजन, गणेश पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button