१२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत श्री एन टी मुंदडा स्कूल ला विजेतेपद!
अमळनेर जैन इरीगेशन सिस्टिम आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी जळगाव यांच्यातर्फे जळगाव जिल्हा १२ वर्षाखालील आंतर शालेय मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत श्री. एन टी मुंदडा ग्लोबल व्हीव स्कूल अमळनेर ला विजेतेपद मिळाले तर काशिनाथ पल्लोड स्कूल जळगाव ला उपविजेतेपद मिळाले . स्पर्धेत श्री एन टी मुंदडा ग्लोबल व्हीव स्कूल क्रिकेट संघाचा कर्णधार स्वरूप संदीप नेरकर याने अंतिम सामन्यासह तीन सामन्यात सामनावीर चा पुरस्कार मिळवित मालिकावीरचा पुरस्कार देखील मिळाल्याने स्वरूप नेरकर याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सदर स्पर्धेतील सर्व सामन्यात स्वरूप संदीप नेरकर यानेच स्पर्धेतील एकमेव अर्धशतक झळकावले यासाठी ‘स्पेशल अचिव्हमेंट्स’ चा पुरस्कार देखील मिळाला. १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट मध्ये अल्पावधीतच नावारूपाला आलेला स्वरूप हा अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयातील प्रा.संदिप नेरकर यांचा सुपुत्र आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर स्पर्धेत मानस पाटील ला देखील उत्कृष्ट झेल व क्षेत्ररक्षण साठी स्पेशल अचिव्हमेंट्स चा पुरस्कार मिळाला .तर एका सामन्यासाठी ओम पाटील यास सामानविर पुरस्कार तसेच देवर्षी शिंपी यास उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी सामनाविर ष उत्कृष्ट गोलंदाजी चा पुरस्कार मिळाला.
श्री.एन.टी.मुंदडा ग्लोबल व्हिव क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रमीझ सर , रौनक सर, प्रतीक सर , रोहन मुंदडा सर , संस्थेचे चेअरमन श्री प्रकाश मुंदडा , श्री योगेश मुंदडा , श्री पंकज मुंदडा , प्रिन्सिपॉल श्री लक्ष्मण सर व सर्व शिक्षकांनी स्वरूप नेरकर व यशस्वी संघाचे अभिनंदन केले आहे .







