स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘वल्ड फार्मासिस्ट डे’ संपन्न
पंढरपूर- प्रतिनिधी रफिक अतार
जागतिक औषध निर्माता दिना (फार्मासिस्ट डे) निमित्त स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीच्या डिग्री आणि कॉलेज ऑफ फार्मसी डिप्लोमा या दोन्ही महाविद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात आले.
प्रारंभी दोन्ही फार्मसी महाविद्यालायातील विद्यार्थ्यांनी ‘वल्ड फार्मासिस्ट डे’ निमित्त प्रतिज्ञा घेतली. यावेळी मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन, पोस्टर प्रेसेंटेशन, सुडोको कॉम्पिटिशन, व्हिडिओ मेकिंग कॉम्पिटिशन, रांगोळी कॉम्पिटिशन अशा फार्मसीचे महत्व पटवून सांगणाऱ्या विविध विषयांवरील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या जागतिक फार्मासिस्ट दिनाचे बोधवाक्य ‘सेफ अँड इफेक्टिव्ह युज ऑफ ड्रग इन ऑल’ हे होते. आयोजिलेल्या कार्यक्रमात बोलताना डॉ. गोविंद भगनुरे यांनी औद्योगिक क्षेत्रामध्ये चालणाऱ्या गूड मनुफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस याबद्दल सविस्तर आणि महत्वपूर्ण माहिती दिली. त्यानंतर डॉ.प्रदिप सगर-पाटील यांनी ‘सेफ अँड इफेक्टिव्ह युज ऑफ ड्रग इन ऑल’ तसेच त्यांनी ई-फार्मसीबद्धल माहिती दिली. यानंतर मानसोपचार तज्ञ डॉ. संगीता पाटील म्हणाल्या की, ‘डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील दुवा म्हणून फार्मासिस्ट काम पाहत असतो. म्हणून फार्मासिस्ट हा समाजाच्या व रुग्णाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. रुग्णाला बरे करणारा हा डॉक्टर असतो आणि समाज हा डॉक्टरांनंतर फार्मासिस्टकडे आशेने पहात असतो. त्याचावर उपचाराबद्धल विश्वास ठेवतो. यासाठी फार्मासिस्टचे कार्य पाहताना आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून काम केले पाहिजे.’ असे सांगून फार्मासिस्टची नेमकी काय भूमिका असते हे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत पोस्टर प्रेझेंटेशन, मॉडेल मेकींग कॉम्पिटिशन, रंगोली कॉम्पिटिशन घेण्यात आले. कार्यक्रमासाठी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे पंढरपूर तालुका अध्यक्ष प्रशांत खलिपे, स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.अमित गंगवाल, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, डॉ. मिथुन मणियार, प्रा.रामदास नाईकनवरे, प्रा. प्रज्ञा साळुंखे, प्रा. वृणाल मोरे यांच्यासह इतर प्राध्यापक व दोन्ही महाविद्यालयातील असे मिळून जवळपास ३५० विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन शितल नरळे आणि स्वप्ना सावंत यांनी केले तर आभार प्रा.स्नेहल चाकोरकर यांनी मानले. यावेळी फार्मासिष्ट डे’ च्या निमित्ताने सर्व वर्ग व प्रयोगशाळा सजविण्यात आल्या होत्या.
‘वल्ड फार्मासिस्ट डे’ निमित्त स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसीच्या पदवी व पदविका या दोन्ही महाविद्यालयात फार्मसी संदर्भात विविध स्पर्धा व व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करताना बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, सोबत मानसोपचार तज्ञ डॉ. संगीता पाटील, डॉ. गोविंद भगनुरे, डॉ.प्रदिप सगर-पाटील व आदी. २. मार्गदर्शन करताना मानसोपचार तज्ञ डॉ. संगीता पाटील, सोबत डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, डॉ. गोविंद भगनुरे, डॉ.प्रदिप सगर-पाटीलव आदी







