Kolhapur

महाराष्ट्र राज्य माध्यमिक ,उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडूनदहावी, बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक ,उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर.

सुभाष भोसले-कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्य माध्यमिक मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आलं. १८ फेब्रुवारी २०२० पासून बारावीच्या तर ३ मार्चपासून दहावीच्या परीक्षांना सुरूवात होणार आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचं वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येईल. मंडळाने
जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १८ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान बारावीच्या परीक्षा पार पडणार आहेत. तर ३ मार्च ते २३ मार्च दरम्यान, दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध करून दिलं आहे
तसंच हे संभाव्य वेळापत्रक असून परीक्षेपूर्वी महाविद्यालयं आणि शाळांमध्ये पाठवण्यात येणारं परीक्षेचं वेळापत्रकच अंतिम मानण्यात येणार असल्याचंही मंडळाकडून सागंण्यात आलं.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button