Atpadi

आटपाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी !

आटपाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी !

उन्नती फाउंडेशन ! आटपाडी ; /

प्रतिनिधी राहुल खरात
महिला या हाऊस वाईफ नसुन हाऊस मेकर आहेत.चालत आलेल्या परंपरा या विज्ञानाच्या दृष्टीकोणातून पाहाव्यात जसे वटपौर्णिमा साजरी करताना फळाच्या बियांचे सिड बॉल तयार करून प्रवासाला जाताना फेकावे ! यामुळे जास्तीत जास्त झाडे उगवतील ! तसेच नकुशी हे नाव ज्या मुलीचे आहे.त्यांचे पुन्हा बारसे घालून नाव बदला ! असे आहवान डॉ.सुप्रिया कदम यांनी उन्नती महिला विकास फाऊडेशन तर्फे आयोजित सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमांत केले.
या निमित्ताने मुलीच्या वेषभुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ! होते.आटपाडीतील जिल्हा परिषद शाळा,अंगणवाडी,डॉयनामिक स्कुल,बालविकास मधील तब्बल 85 विदयार्थ्यानी स्पर्धेत सहभाग नोंदवला.यावेळी उन्नती महिला विकास फाऊडेशन अध्यक्षा अनिता पाटील,पंचायत समिती नुतन सभापती डॉ.भूमिका बेरगळ,माजी सभापती सुमन नागणे,माजी सभापती जयमाला देशमुख,प्रा.विजय शिंदे,वंदना जाधव,मंजुश्री पाटील,शोभा जाधव,रेखा पाटील,वैशाली बालटे,निता ऐवळे उपस्थित होत्या.!
डॉ.कदम पुढे म्हणाल्या,म्रामक गोष्टीकडे दुर्लक्ष करा अन्न शिजवण्यासाठी विशिष्ट लिंगाची आवश्यकता नाही.स्त्रि – पुरूष समानता प्रत्यक्ष अवलंबनात आणली पाहिजे.आर्शिवाद देताना तुला मुलगी होऊ दे म्हणून आर्शिवाद दया.पूर्वीच्या काळी महिनाला आराम मिळावा म्हणून मासिक पाळीत बाजूला बसवायचे आजचा विटाळ चुकीचा आहे.
वेशभुषा स्पर्धेत स्मिता सांळुखे यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिेले.85 स्पर्धेकामध्ये अतिषय चांगी निवड करून मोठया गटात प्रथम क्र.सानिका बालटे जि.प.शाळा पुजारवाडी आ.व्दितीय क्रं.अर्नवी बनसोडे,तृतीय चैत्राली जाधव,छोटया गटामध्ये प्रथम आरोही गायकवाड,व्दितीय श्रेया कुलकर्णी,तृतीय अक्षरा म्हात्रे यांनी क्रमांक पटकविले.

Leave a Reply

Back to top button