Atpadi

परिवर्तन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.रामदास नाईकनवरे यांची निवड

परिवर्तन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.रामदास नाईकनवरे यांची निवड

आटपाडी दि. 4 (प्रतिनिधी):

राहुल खरात

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन सावर्डे ता.हातकणंगले जि. कोल्हापूर यांच्यावतीने रविवार दिनांक 5 जानेवारी 2020 रोजी होणार्‍या परिवर्तनवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आटपाडी येथील प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ. नाईकनवरे हे आटपाडी येथील कला व विज्ञान महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. मराठी साहित्याचे व्यासंगी शिक्षक असून साहित्य समीक्षक,संशोधक,लेखक, कवी,वक्ते म्हणून परिचित आहेत. विद्यापीठ, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. सामाजिक चळवळ आणि साहित्य संशोधन हा त्यांचा व्यासंग आहे. अनेक कवितासंग्रह, गझलसंग्रह व कथासंग्रह यांना त्यांनी प्रस्तावना लिहून नवोदित साहित्यिकांना प्रेरणा दिली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल कांबळे यांनी अध्यक्षपदाच्या निवडीचे त्यांना पत्र दिले.

Leave a Reply

Back to top button